धुळ्यातील भाजपच्या महापौरांनी आक्षेपार्ह पोस्टमुळे घेतला टोकाचा निर्णय, भाजपाच्या आमदाराचा दावा, पण डॉक्टरांचा वेगळाच खुलासा, थेट..
धुळ्यात राजकीय घडामोडींचा मोठा राडा सुरू आहे. त्यातच भाजपा आमदाराने केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली. मात्र, महापौर माया परदेशी प्रकरणात डॉक्टरांनी वेगळाच मोठा खुलासा केला. धुळ्यात भाजपाची मोठी बदनामी सुरू असल्याचे बघायला मिळतंय.

धुळ्यातील एका बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांनी आयुषय संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी थेट विषप्राशन केल्याचे सांगण्यात आले. महापौर माया परदेशी यांनी विषप्राशन करून केल्याची बातमी शहरात पसरताच सगळ्यांना धक्का बसला. मागील काही दिवसांपासून महापौर माया परदेशी वादाच्या भोवण्यात अडकल्या आहेत. माया परदेशी यांच्या विषप्राशननंतर आमदार अनुप अग्रवाल आक्रमक भूमिका घेताना दिसले. अनुप अग्रवाल यांनी घटनेची माहिती मिळताच रूग्णालयात धाव घेतली आणि त्यांची विचारपूस केली. या प्रकरणात आता मोठा खुलासा होत आहे. डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. संजय शर्मा यांनी सोशल मिडीयावर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आली गोरक्षक असलेल्या संजय शर्मा यांच्याकडून निषेध करत मोर्चा काढण्यात आल्यानेच तणावात येऊन महापौर मायादेवी परदेशीयांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अनुप अग्रवाल यांनी केला होता.
मात्र, यासंदर्भात डॉक्टरांनी वेगळीच माहिती दिली. महापौरांनी गोळ्यांचा ओव्हर डोस घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि त्यांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी म्हटले. महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन केल्याचा दावा भाजपा आमदाराने केल्याने सर्वांना धक्का बसला होता. पण डॉक्टरांनी वेगळाच खुलासा केला.
धुळे शहरात गोरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय शर्मा यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह महापौर मायादेवी परदेशी आणि त्यांच्या कुटुंबियावर गंभीर आरोप कत्तलखान्यांविषयी केले. यानंतर त्यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. हा वाद टोकाला पोहोचला. आपली विनाकारण बदनामी केली जात असल्याचे सांगत महापौर मायादेवी परदेशी थेट आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी काही वेळातच महापौरांची समजूत काढत त्यांचे उपोषण मागे घेतले.
हेच नाही तर गोरक्षक संजय शर्मा यांच्यावर 20 नोव्हेंबर रोजी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी महापौरांच्या दबावाने गुन्हे दाखल केला असल्याचा आरोप अटकेपूर्वी संजय शर्मा यांनी केला आणि व्हिडीओ व्हायरल केला. संजय शर्मा यांच्या घरावरही भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. महापाैरांच्या लेकासोबत पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केली. याप्रकरणात भाजप आमदारांनी महापाैरांनी विषप्राषश केल्याचे म्हटले पण डॉक्टरांनी स्पष्ट केले महापाैरांनी विषप्राशन केले नाही तर औषधांचा ओव्हरडोस झाला.