
Mumbai : आजच्या महागाई आणि धकधकीच्या आयुष्यात काही निवांत क्षण मिळावे यासाठी मुंबईतर समुद्र किनारी येतो आणि काही काळ निवांत बसतो… अशात आता वरळी सी फेस येथे लोकांची गर्दी जमत आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये असं काही दिसत आहे, जे मुंबईत दिसणं अशक्य आहे… तेच दृश्य पाहण्यासाठी मुंबईकरांनी वरळी सी फेस येथे गर्दी केली आहे… अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की असं काय खास आहे… तर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील कळेल की लोकांची गर्दी वरळी सी फेस येथे का जमली आहे.
सांगायचं झालं तर, सचीन चव्हाण नावाच्या एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ वरळी सी फेस येथील आहे… सचीन याने व्हिडीओमध्ये अथांग समुद्र तर दाखवलाच आहे, पण समुद्रात दिसणाऱ्या एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे… व्हिडीओ दुसरं तिसरं काही नाही तर, डॉल्फिन मासे दिसत आहेत. जे मुंबईच्या समुद्रात दिसणं अशक्य आहे.
मुंबई मधील वरळी सी फेस येथील डॉल्फिन माशांच्या आगमन झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वरळी सी फेस येथे दिसणाऱ्या डॉल्फिन माशाची चर्चा सुरु आहे… व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओ पोस्ट करत सचिन यांने कॅप्शनमध्ये, ‘काँक्रीट आणि गोंधळामध्ये.. डॉल्फिन क्षण…’ असं लिहिलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे… तर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी डॉल्फिन मासे पाहण्यासाठी गर्दी केली आहे…
व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘5 वर्षांनंतर हा क्षण अनुभवायला मिळाला आहे… कोरोना काळात डॉल्फिन दिसले होते…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘धुरंधर’ पाहण्यासाठी आला असेल… तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पाणी स्वच्छ ठेवल्याचे सकारात्मक परिणाम आहे…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘एक सुंदर सकाळ…’ एवढंच नाही कर, काहींनी एआय व्हिडीओ असल्याचा देखील दावा केला आहे.