कोपर पुलाच्या कामावरुन केडीएमसीत राजकारण तापलं, आयुक्तांपूर्वी शिवसेनेनेचं नारळ फोडलं

| Updated on: Mar 22, 2021 | 3:15 PM

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे गर्डर आज (22 मार्च) पहाटे (Dombivali Kopar Bridge Girder Work) डोंबिवलीत दाखल झाले.

कोपर पुलाच्या कामावरुन केडीएमसीत राजकारण तापलं, आयुक्तांपूर्वी शिवसेनेनेचं नारळ फोडलं
KDMC Shivsena
Follow us on

डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे गर्डर आज (22 मार्च) पहाटे (Dombivali Kopar Bridge Girder Work) डोंबिवलीत दाखल झाले. केडीएमसी आयुक्तांच्या आधीच शिवेसना पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून आनंद व्यक्त केला. मात्र, आयुक्तांच्या समोरच भाजप आमदारांनी कामात दिंरगाई झाल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचे राजकारण तापले आहे (Dombivali Kopar Bridge Girder Work Shivsena Vs BJP In KDMC).

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक झाल्यने 2019 मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. एप्रिल 2020 मध्ये पूलाचे पाडकाम करण्यात आले. 45 मीटर पूलाचे काम सुरु झाले. हे काम संथ गतीने सुरु होते. लॉकडाऊननंतर कामाला वेग आला. पूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन टप्प्यात या पूलाचे 21 गर्डर बसविले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील सात गर्डर आज सकाळी डोंबिवलीत दाखल झाले. शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि पदाधिकारी राजेश कदम यांनी काही विलंब न करता सकाळी सहा वाजता नारळ फोडून आनंद व्यक्त केला. शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे की, पूलाचे काम सुरु होते, तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी पूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गर्डर डोंबिवलीत दाखल झाले आहे. हे गर्डर टाकण्यात येणार आहे. लवकरच हे काम मार्गी लावून पूल लोकांच्या सेवेत दाखल होईल. भाजप केवळ कामाचे क्षेय घेते तर शिवसेना का करुन दाखविते असा टोला भाजपला लागवला.

सकाळी दहा वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी पुलाजवळ पोहचले. त्यांनी नारळ फोडून गर्डर टाकण्याचे काम सुरु झाल्याचे स्पष्ट केले. लवकर हे काम मार्गी लागणार. यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कामाचे कौतूक केले.

मात्र, यावेळी स्थानिक भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी नारळ फोडण्यास नकार दिला. त्यांच्या जागी मंदार हळबे यांनी नारळ फोडला. यावेळी आमदार चव्हाण यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. कोपर पुलाच्या कामात दिरंगाई झाली आहे. 20 महिने उलटून गेले आहे. प्रत्येक कामात प्रशासन स्वत: पाठ थोपटून घेते. दिरंगाई का होते हे सांगत नाही. फक्त आणि फक्त प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे प्रकल्प रखडले असल्याचा आरोप भाजप आमदार चव्हाण यांनी केला आहे.

गर्डरच्या निमित्ताने पुन्हा एकादा शिवसेना भाजप आमने-सामने आली आहे.

Dombivali Kopar Bridge Girder Work Shivsena Vs BJP In KDMC

संबंधित बातम्या :

केडीएमसी अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई

कोविड प्रसारक मंडळ? नको रे बाबा… मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला

PHOTO | कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, 25 जानेवारीला पत्री पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन