PHOTO | कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, 25 जानेवारीला पत्री पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

येत्या सोमवारी 25 जानेवारीला सकाळी साडे बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 11:13 AM, 23 Jan 2021
1/5
कल्याण-डोंबिवलीकरांची गेल्या अनेक काळापासूनची इच्छा अखेर आज पूर्ण झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या दिवसाची वाट कल्याणवासी पाहात होते, त्या पत्री पुलाचे काम अखेर पूर्ण झालं आहे.
2/5
पत्री पुलाच्या कामामुळे गेल्या 26 महिन्यांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, आता या पुलाचं काम झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
3/5
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अखेर 26 महिन्यानंतर पूर्ण झाले आहे.
4/5
येत्या सोमवारी 25 जानेवारीला सकाळी साडे बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
5/5
त्यामुळे अखेर वाहतूककोंडीतून सुटका होण्याचा मुहूर्त निश्चित झाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.