
डोंबिवली पूर्वेतील एका कुटुंबाला मध्यरात्री त्यांच्याच घरात बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आजदेपाडा येथील साई दर्शन इमारतीत ही भयानक घटना उघडकीस आली. ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील आजदेपाडा परिसरातील साई दर्शन इमारतीत राहणारे रवींद्र काटे यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरून टाळा लावला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब घरातच अडकून पडले. सकाळी दरवाजा उघडता येत नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला असता, घराला बाहेरून टाळा लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे घरात उपस्थित महिला आणि लहान मुलांमध्ये भीती पसरली.
या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजाचा टाळा तोडण्यात आला. काटे कुटुंबाची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे. तसेच, शेजारी आणि स्थानिकांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.
या घटनेमागे वैयक्तिक वाद, धमकी किंवा इतर कोणताही उद्देश आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या प्रकारामुळे डोंबिवली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत असून, लवकरच आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले आहे.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमागे वैयक्तिक वाद आहे की अन्य काही उद्देश, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, शेजारी आणि स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. या घटनेमुळे डोंबिवलीच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.