AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना VIP साठी महाराष्ट्र सरकारचा नव्या गाड्या खरेदीचा निर्णय, किंमत वाचून डोळे विस्फारतील

महाराष्ट्र सरकारने घेतलेला एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त पैसा दुष्काळासाठी वापरला गेला पाहिजे. एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत.

दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना VIP साठी महाराष्ट्र सरकारचा नव्या गाड्या खरेदीचा निर्णय, किंमत वाचून डोळे विस्फारतील
Innova Crysta
| Updated on: Oct 13, 2026 | 9:54 AM
Share

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही अशी स्थिती आहे. एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. राज्य सरकारने नियम, निकष बाजूला ठेऊन शेतीचे सर्वे सुरु केले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्याला लवकरात लवकर, जास्तीत जास्त मदत मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. केंद्राकडून आवश्यक मदतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चैनीच्या गोष्टी टाळण्याची गरज आहे. जास्तीत जास्त पैसा दुष्काळासाठी वापरला गेला पाहिजे. पण आता महाराष्ट्र सरकारने घेतलेला एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

दुष्काळाच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारकडून व्हीआयपी अतिथींसाठी नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तब्बल 12.68 कोटी रुपये खर्चून 44 गाड्या खरेदीसाठी मंजुरी मिळाली आहे. यात सगळ्यात महागडी गाडी चार कोटी रुपयांची आहे. या निर्णयामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील सरकारच्या परिवहन विभागाकडून जुन्या झालेल्या आणि दुरुस्ती शक्य नसलेल्या गाड्या बदलून नव्या कार विकत घेण्याच्या प्रस्तावाला शिष्टाचार विभागाने मंजुरी दिली आहे. या ताफ्यात बुलेटप्रूफ गाड्या आहेत. 32 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, सात मारुती सुझुकी एर्टिंगा, दोन टोयोटा फॉर्च्युनर, फोर्स उर्बानिया बस आणि टोटा टोइंग या गाड्यांचा समावेश आहे. डेक्कन क्रोनिकलने हे वृत्त दिलं आहे.

सरकार कशाला प्राथमिकता देतय

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी महायुती सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. जनतेला काटकसरीचा उपदेश करायचा आणि स्वतः मात्र व्हीआयपी सुखसोयींवर खर्च करायाचा असा आरोप केला आहे. शेतकरी दुष्काळाचा सामना करतायत, मदतीची त्यांना गरज आहे अशावेळी कोट्यवधी रुपये व्हीआयपी गाड्यांवर खर्च करायचे. यावरुन सरकार कशाला प्राथमिकता देतय अशा प्रश्न निर्माण होतो.

वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफी माफीवरून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन. मोजक्याच विद्यार्थ्यांना शुल्कमाफी मिळत असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आदेशाची कार्यकर्त्यांकडून होळी. उदय सामंत यांच्या आजच्या दौऱ्याला विद्यार्थ्यांच्या शुल्क माफी वरून विरोध करण्याचा इशारा. दुष्काळग्रस्त भागातील सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान