Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज

| Updated on: Jul 22, 2021 | 11:45 PM

महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली आहे.

Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज
MAHAD LANDSLIDE
Follow us on

रायगड : महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली आहे. या घटनेत 30 घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण 72 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा सपंर्क तुटला आहे. (due to heavy rain landslide in mahad raigad 30 houses buried 72 people lost)

मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, 72 नागरिक बेपत्ता

कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस आहे. येथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

रायगडमध्ये मुसळधार पाऊस 

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.  महाड आणि माणगाव तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस बरसत असून आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे.

भोर-महाड मार्गावर पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या, वरंधा घाट बंद

भोर-महाड मार्गावर अनेक ठिकणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आलाय. पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक प्रवाशी अडकले आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या परिसरात 249 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. बुधवारी रात्रीपासून या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडतोय. या मार्गावर अनेक ठिकाणी पडझड झालीय. याच भोर-महाड मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत भोर-महाड रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, बिस्किट, चटई पांघरुन देण्याची व्यवस्था करत आहोत : प्रविण दरेकर

दरम्यान बिरवाडीपासून 14 km अतंरावर दरड कोसळल्यामुळे या दुर्घटनाग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर धावले आहेत. “तळईपासून अर्धा तासाच्या अंतरावर मी, गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे अडकून पडलो आहोत. तळईचे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी माहिती दिली आहे की, गावात 25 ते 30 घरं दरड कोसळून त्याखाली आलेली आहेत. यात कुणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळालेली नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी जवळच्या बिरवाडी पोलीस स्टेशनवरुन अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. उपजिल्हाधिकारीही जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही एका ठिकाणी थांबलो आहोत. पाणी ओसरलं नाही तर एनडीआरएफच्या बोटीतून पुढे दासगावला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून बिस्किट, चटई आणि पांघरुन देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलीय.

इतर बातम्या :

Maharashtra Rain Live | महाडमध्ये मोठी दुर्घटना, 30 घरांवर दरड कोसळली, 72 जण बेपत्ता

घरात पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी घराबाहेर पडले, पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक नदीत वाहून गेले

Raj Kundra Arrest : राज कुंद्रा यांनी दीड वर्षात 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवले? गुन्हे शाखेला मोठा साठा उपलब्ध

(due to heavy rain landslide in mahad raigad 30 houses buried 72 people lost)