Raj Kundra Arrest : राज कुंद्रा यांनी दीड वर्षात 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवले? गुन्हे शाखेला मोठा साठा उपलब्ध

गुन्हे शाखेने टीबी (टेराबाइट्स) मध्ये चालणाऱ्या अश्लील चित्रपटांचा मोठा डेटा जप्त केल्याची माहिती मिळत आहे. क्राइम ब्रँचने असंही म्हटले आहे की, बराट डेटा डिलीट करण्यात आला आहे. जो रिकव्हर करण्यास वेळ लागणार आहे.

Raj Kundra Arrest : राज कुंद्रा यांनी दीड वर्षात 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवले? गुन्हे शाखेला मोठा साठा उपलब्ध
राज कुंद्रा

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यात आहे. राज कुंद्रा यांनी दीड वर्षाच्या कालावधीत 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवल्याची माहिती मिळतेय. अंधेरी पश्चिमेत असलेल्या कुंद्रा यांच्या मालकीच्या वियान कंपनीच्या कार्यालयात गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी गुन्हे शाखेने टीबी (टेराबाइट्स) मध्ये चालणाऱ्या अश्लील चित्रपटांचा मोठा डेटा जप्त केल्याची माहिती मिळत आहे. क्राइम ब्रँचने असंही म्हटले आहे की, बराट डेटा डिलीट करण्यात आला आहे. जो रिकव्हर करण्यास वेळ लागणार आहे. त्यासाठी गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. (Strong evidence against Raj Kundra to Crime Branch)

पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार

राज कुंद्रा आणि आणखी एक आरोपी रायन थॉर्पे यांची पोलिस कोठडी 23 जुलै रोजी संपत आहे. तपासासाठी गुन्हे शाखा राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहे. उद्या कुंद्रा यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत पोहोचले आहेत? याची माहिती गुन्हे शाखेला मिळवायची आहे. त्यामुळे कुंद्रा यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली जाणार आहे.

कुंद्रा यांना मिळत होता मोठा फायदा

पोलिस अधिकायांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्रा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये अश्लील चित्रपट बनवायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनविले आहेत. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटांच्या माध्यमातून कुंद्रा यांनी मोठी कमाई केली आहे. ती कमाई कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. कुंद्रा यांच्या अ‍ॅपसाठी सुमारे 20 लाख लोकांनी सदस्यता घेतली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत होते आणि नफ्यात चांगले पैसे ही मिळू लागले होते. वेबसाइटपेक्षा सहज उपलब्ध असल्याने कुंद्रा यांनी अश्लील चित्रपट अपलोड करण्यासाठी अॅप बनवले होते.

तपासात फॉरेन्सिक टीमची मदत

अंधेरी पश्चिम येथील राज कुंद्रा यांच्या कार्यालयात गुन्हे शाखेने धाड टाकून शोध मोहीम राबविली. अश्लील चित्रपटाचा डेटा सर्व्हरमध्ये सेव्ह करण्यात आला होता, जो गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. डेटा टीबी (टेराबाइट) मध्ये आहे. सूत्रांनी सांगितले की बराच डेटा डिलीट केला गेला आहे. तो डेटा पुन्हा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांची मदत गुन्हे शाखे तर्फे घेतली जात आहे. पोलिसांनी असंही म्हटलं आहे की, कुंद्राने सुमारे 100 अश्लील चित्रपट बनवले आहेत.

चौकशीत कुंद्राचे सहकार्य नाही !

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, राज कुंद्रा पोलिस तपासात सहकार्य करत नाही. ते बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देत नाही आणि बर्‍याच आरोपांचा इन्कार करत आहेत. कुंद्रा यांनी पोलिसांना सांगितले की, त्याने कधीही अश्लील चित्रपट बनवले नाहीत. मात्र, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मत कुंद्रा यांच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत.

संबंधित बातम्या :

Raj Kundra : दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात, पाहा राज कुंद्राचे लेटेस्ट फोटो

Raj Kundra Top 10 Memes : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर मीम्सची बरसात, तुम्हालाही येईल हसू

Strong evidence against Raj Kundra to Crime Branch

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI