
मोठी बातमी समोर येत आहे, मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील याचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून तब्बल 10 तास झाली चौकशी करण्यात आली आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विनोद पाटील यांची चौकशी सुरू होती. दरम्यान पुन्हा एकदा आणखी ईडीकडून विनोद पाटील यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विनोद पाटील यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोढा ग्रुपचे विश्वस्त फसवणूक प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे.
लोढा गृपचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यासह दहा जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल होता, या प्रकरणाची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे, त्यानंतर आता या प्रकरणात इडीची एन्ट्री झाली असून, आज विनोद पाटील यांची इडीकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. विनोद पाटील यांची इडीकडून आज तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली, दरम्यान पुन्हा एकदा इडीकडून विनोद पाटील यांची चौकशी होणार असून, त्यासाठी त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
लोढा ग्रुपचे विश्वस्त फसवणूक प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे. लोढा गृपचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यासह दहा जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल होता, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता इडीकडून देखील चौकशी सुरू झाली आहे. राजेंद्र लोढा यांनी केलेल्या जमीन आणि टीडीआर आर्थिक गैरव्यवहाराबाबत ही चौकशी सुरू आहे. लोढा ग्रुपचे विश्वस्त यांचा विश्वासघात आणि फसवणूक प्रकरणी राजेंद्र लोढा यांच्या नंतर आता विनोद पाटील यांचा देखील समांतर तपास ईडीकडे आला आहे. ईडीचं पथक विनोद पाटील यांचा जबाब घेऊन मुंबईलाच्या दिशेनं रवाना झालं आहे. दरम्यान आता या प्रकरणात विनोद पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे. त्यांची पुन्हा एकदा इडीकडून चौकशी होणार आहे.