AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध ?

शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीकडून विरोध होत आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची परवानगी ईडीने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. 15 मार्चला आता पुढील सुनावणी होणार आहे. अजित पवार यांच्यावर याप्रकरणी आरोप झाले होते.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध ?
| Updated on: Mar 03, 2024 | 10:03 AM
Share

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 3 मार्च 2024 : शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीकडून विरोध होत आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची परवानगी ईडीने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. 15 मार्चला आता पुढील सुनावणी होणार आहे. अजित पवार यांच्यावर याप्रकरणी आरोप झाले होते.

अजिक पवार आणि इतर नेत्यांशी संबधित असलेल्या शिखर बँक घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र या सुावणीदरम्यान ईडीने हस्तक्षेप करण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे. अद्याप कोर्टाकडून ईडीला परवानगी मिळालेली नाही. मात्र 15 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी ईडीला याप्रकरणी परवानगी मिळाली तर ईडीकडून याप्रकरणी युक्तिवाद केला जाऊ शकतो. आणि मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध केला जाऊ शकतो.

मुंबई पोलिसांच्या मूळ एफआयआरमध्ये अजित पवार आणि इतर नेत्यांची आरोपी म्हणून नावं होती. जवळपास 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप याप्रकरणी झाला आहे. मुंबई पोलिसांनी कुठलेही पुरावे उपलब्ध होत नसल्याचे कारण देत दोन वेळा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र पहिला क्लोजर रिपोर्ट होता तो पुन्हा तपास करायचा आहे असे सांगत मुंबई पोलिसांनी मागे घेतला होता. त्यानंतर मागच्या महिन्यात पुन्हा एकदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र ईडीने यावर आक्षेप नोंदवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाकडून ईडीला परवानगी मिळाली तर ईडीकडून युक्तिवाद करताना या क्लोजर रिपोर्टला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. 15 मार्चला नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...