परभणी : पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ ते दहा मुलांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याने आठ ते दहा मुलांच्या हात पाय वर चावा घेतल्याने मोठा रक्तस्त्राव झाला आहे. तर जखमी मुलांवर आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

परभणी : पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ ते दहा मुलांना चावा
कुत्रा
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 06, 2022 | 6:39 PM

परभणी : परभणीच्या (Parbhani) गंगाखेड शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान आधी मधी येणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा अशा बातम्यांमुळे अनेकांच्या चिंतेत वाढ होत असते. दरम्यान परभणीच्या गंगाखेड शहरात (Gangakhed city)आज एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ ते दहा मुलांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याने मुलांना चावा घेतल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे. ही घटना परभणीच्या गंगाखेड शहरातील दस्तगिर मोहल्ला येथील असून जखमी मुलांना गंगाखेड रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात (Ambejogai government hospital) पाठविण्यात आले आहे.

परभणीच्या गंगाखेड शहरातील दस्तगिर मोहल्ला येथे मागील काही दिवसांपासून पिसाळलेले कुत्रे भटकत होते. मात्र त्याबद्दल कोणीही काळजी घेतली नाही. दरम्यान आज येथे फिरणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याने आठ ते दहा मुलांना चावा घेतला. तसेच मुलांच्या हातापायाचे लचके ओढले. ज्यामुळे अनेक मुलांच्या हातापायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. यावेळी नागरिकांनी कुत्र्याला हुसकवून लावत मुलांना त्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून वाचवले. तर या घटनेमुळे परिसरात भीती पसरली होती.

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या मुलांना तातडीने गंगाखेड रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हालविण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या सर्व जखमी मुलांवर आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांनी धसका घेतला असून पालिकेने या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.