पक्ष वाढवायचा की संपवायचा? एकनाथ शिंदे आपल्याच पालकमंत्र्यांना वैतागाले

एकनाथ शिंदे आपल्याच पालकमंत्र्यांवर संतप्त झाले. पक्ष वाढवायचा की संपवायचा? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याच पालकमंत्र्यांना केला.

पक्ष वाढवायचा की संपवायचा? एकनाथ शिंदे आपल्याच पालकमंत्र्यांना वैतागाले
Eknath shinde news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 11:32 AM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटाचे आमदार, जिल्हाप्रमुख  आणि उपजिल्हाप्रमुखांकडून पालकमंत्र्यांविरोधात एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. पालकमंत्री हे पक्ष संघटनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केला आहे.  या तक्रारीनंतर एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला. तुम्हाला पक्ष वाढवायचा की संपवायचा, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना वैतागल्याचे समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार, जिल्हाप्रमुखांनी पालकमंत्री पक्ष संघटनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करत शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यात अपेक्षित प्रयत्न होत नसल्याची थेट तक्रार पदाधिकाऱ्यांनी शिंदेकडे केली. अनेक पालकमंत्री केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवायची कशी, असा थेट सवाल जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांकडून शिंदेंकडे करण्यात आला. विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच या तक्रारींची दखल घेत एकनाथ शिंदे संबंधित मंत्र्यांवर संतप्त झाले.

Loading...

पक्ष वाढवायचा आहे की संपवायचा आहे? अशा शब्दांत पालकमंत्र्यांना एकनाथ शिंदेंनी खडेबोल सुनाावले. पक्ष संघटनेच्या कामात तातडीने बदल करण्याचे थेट निर्देश मंत्र्यांना देण्यात आले. पालकमंत्र्यांनी संघटनेला वेळ देऊन पदाधिकाऱ्यांशी समन्वय वाढवण्याची सूचना शिंदेंनी पालकमंत्र्यांना केली. आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात सक्रिय राहण्याचे निर्देश दिले. ‘कामात लवकर बदल करा, हे योग्य नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना सुनावल्याची माहिती हाती येत आहे. आता शिंदे गटातील हा अंतर्गत वाद कसा सोडवतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.  तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आलं होतं. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कबुली दिली होती. नंदूरबारमधील शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याचा दाव केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील पक्षातील गटबाजी उघड झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us