एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकी काय चर्चा होणार?
एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरून बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीत नेमकी काय चर्चा होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत. राज्यातील दुष्काळामुळे प्रमुख नेत्यांकडून मदत, दौरे केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत. एकनाथ शिंदे सातत्याने आढावा घेत आहेत. आता शिंदे पक्षाच्या नगराध्यक्षांकडूनही सर्व आढावा घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेना नगराध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. शिंदेंनी बोलावलेल्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
एकनाथ शिंदेंनी बोलावली नगराध्यक्षांची बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना नगराध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत दोन वाजता बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून नगराध्यक्षांच्या भागातील दुष्काळ भाग, शेतकरी, पाणी टंचाई अशा विषयांचा आढावा घेतला जाणार आहे. येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील. महायुतीमधील वाद, भांडण असतील. यावर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच पक्ष कसा वाढवायचा , विकास कामे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काय केले पाहिजे, यावर चर्चा होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सोलापूरच्या दौऱ्यावर होते. सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath shinde) यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त विठुचरणी लीन झाले. यावेळी शिंदेंनी विठारायांना साकडे देखील घातले. ‘मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, वारकरी म्हणून आलोय. बळीराजावरील संकट, दुष्काळाचे सावट दूर कर आणि बळीराजाला ताकद दे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला घातले.
दरम्यान, परभणीच्या पाथरी नगरपरिषदेत एका महिन्यांपूर्वी शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले. शिंदे गटाच्या पाथरीमधील प्रभाग क्रमांक 7 मधील दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला. नगराध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराचे गंभीर आरोप करत नगरसेविका आलम तरन्नुम बेगम मुजीब आणि नगरसेवक पठाण हसीब खान तहजीब खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र पत्राद्वारे बिनशर्त राजीनामे सादर केले होते. त्यामुळे परभणी पाथरीच्या वादावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.