Sanjay Gaikwad : सतत वादात अडकत राहणारे शिंदेंचे आमदार संजय गायकवाड दुष्काळी परिस्थितीत करणार एक चांगलं काम

Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी चर्चेत असतात. गायकवाड चर्चेत राहण्यामागे कुठला ना कुठला वाद असतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे, या काळात संजय गायकवाड एक चांगलं काम करणार आहेत.

Sanjay Gaikwad : सतत वादात अडकत राहणारे शिंदेंचे आमदार संजय गायकवाड दुष्काळी परिस्थितीत करणार एक चांगलं काम
Eknath Shinde-Sanjay Gaikwad
| Updated on: Nov 28, 2026 | 5:40 PM

सध्या राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींनी जास्त जबाबदारीने काम करावं अशी अपेक्षा असते. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे सतत कुठल्या ना कुठल्या वादामुळे चर्चेत असतात. वादग्रस्त वक्तव्यांसाठी ते ओळखले जातात. पण आता शिंदेंचा हा आमदार एक चांगलं काम करणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या, शेतमजूर, विधवा महिलांच्या मुलींचे आणि मुलांचे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावून देणार आहेत. सर्वधर्मीय हा लग्न सोहळा असणार आहे. त्यांना संसारपयोगी साहित्य सुद्धा भेट देण्यात येईल. जिल्ह्यातील महिलांसाठी त्यांनी हाताने बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीचे दालन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

“मायक्रो फायनान्सवाल्यांनी सरकारकडून मिळालेली मदत सुद्धा काढून घेतली. त्यांनी गावगुंड पाळले आहेत. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, असे लोक वसुलीसाठी ठेवतात. शेतकऱ्याच्या घरी जाऊन तमाशा करण्याचे काम मायक्रो फायनान्सवाले करत आहेत. शेतकऱ्याच्या मुलाना विचित्र सुद्धा बोलतात. बेरोजगार युवकाकडून सुद्धा पाप करण्याचे काम मायक्रो फायनान्सवाले करत आहेत” असं संजय गायकवाड म्हणाले.

Loading...

हे आमचे त्यांना उघड चॅलेंज

“मायक्रो फायनान्सवाले जर शेतकऱ्यांच्या घरी वसुलीला गेलेत तर त्यांना आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देणार. शिवसेनेच्या वतीने मायक्रो फायनान्सवाल्यांना हा इशारा आहे . शेतकऱ्यांच्या घरी जायची हिंमत त्यांनी केलीच नाही पाहिजे. हे आमचे त्यांना उघड चॅलेंज आहे. जोपर्यंत दुष्काळाचे संकट जात नाही, तो पर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या दारात फिरकायचं नाही” असं संजय गायकवाड यांनी सांगितलं.

बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहे

“जिल्ह्यातील अनेक महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहे. ज्याप्रमाणे बँकांनी मायक्रो फायनान्सची वसुली थांबवली, त्याचप्रमाणे या महिला बचत गटाच्या सुद्धा वसुलीला स्थगिती द्यावी .राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला मागणी आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना, शेतमजूर महिलाना दिलासा मिळेल” असं संजय गायकवाड म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us