Sanjay Shirsat : ‘आधी नीट ऐकून घ्या, दरवेळी काहीही आरोप केले तर ते मी सहन करणार नाही’ संजय शिरसाट भडकले, थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला वॉर्निंग

Sanjay Shirsat : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना आता महायुतीमधल्या दोन्ही नेत्यांमध्ये आपसात वाद सुरु झाला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे संजय शिरसाट खवळले आणि त्यांनी थेट मी सहन करणार नाही अशा शब्दात राग व्यक्त केला.

Sanjay Shirsat : आधी नीट ऐकून घ्या, दरवेळी काहीही आरोप केले तर ते मी सहन करणार नाही संजय शिरसाट भडकले, थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला वॉर्निंग
Sanjay Shirsat
| Updated on: Nov 12, 2026 | 11:45 AM

महाराष्ट्राचं राजकारण सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाभोवती केंद्रीत झालं आहे. मागच्या आठवड्यापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडतायत, त्यावरुन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? हीच चर्चा रंगली आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटले, यात अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार सुद्धा होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल ज्या बातम्या येतायत त्यावरुन विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल मत मांडला. पण त्यावरुन त्यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला आहे.

“एवढं मात्र नक्की आहे, कोणताही निर्णय घेताना आपल्या समविचारी पक्षांना, महायुतीमधल्या पक्षांना त्यांना विचाराव जरुर लागेल. इतक्या लवकर ते काय निर्णय घेतायत हे सांगणं कठीण आहे. म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, त्यांच्यात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत, त्यावर भाष्य करणं आजच्या घडीला उचित नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

Loading...

असं मी म्हटलं, राष्ट्रवादीवर कोणती टीका केली?

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल तुम्ही जे स्टेटमेंट केल, त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, संजय शिरसाट यांनी बोलू नये. महायुतीत मिठाचा खडा टाकू नका. एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना समज द्यावी. त्यावर संजय शिरसाट यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. “हसन मुश्रीफ यांनी माझं स्टेटमेंट नीट ऐकलेलं दिसत नाही. आधी नीट ऐकून घ्या. दरवेळी काहीही आरोप केले तर ते मी सहन करणार नाही, हे खात्रीने सांगतो. आपसात जी कपडे फाडाफाड सुरु आहे, त्यामुळे तिसरा पक्ष उदयाला येऊ शकतो असं मी म्हटलं. राष्ट्रवादीवर कोणती टीका केली?” असा सवाल त्यांनी केला.

“काय चाललय हे संजय शिरसाट चागंल्या प्रकारे जाणतो. मी तुम्हाला विनंती करतो की, अशा स्टेटमेंट तुम्ही सुद्धा करु नका. मला बोलायला भाग पाडू नका. नाहीतर मी कोणतीही दयामाया ठेवणार नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us