NCP | अजित पवार की शरद पवार? खरे अध्यक्ष कोण, पक्ष कुणाचा? मोठी अपडेट

| Updated on: Sep 15, 2023 | 11:30 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यांपैकी कुणाचा दावा खरा आहे, याची चाचपणी आता थेट निवडणूक आयोगात होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत मोठी बातमी समोर आलीय.

NCP | अजित पवार की शरद पवार? खरे अध्यक्ष कोण, पक्ष कुणाचा? मोठी अपडेट
Follow us on

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी पक्ष दोन गटात विभागला गेलाय. या दोन्ही गटांमध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटांकडून पक्षाचं नाव आणि चिन्हावर कायदेशीर संघर्ष सुरु झालाय. याबाबत आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात देखील होणार आहे. शिवसेना पक्षात फूट पडली तेव्हा ज्या घडामोडी घडल्या होत्या, अगदी तशाच घडामोडी आता घडायला लागल्या आहेत. निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना कार्यालयात बोलावलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवर, पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं या मुद्द्यावर लवकरच निवडणूत आयोगात सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही गटांना 6 ऑक्टोबरला बोलावलं आहे. निवडणूक आयोगात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या सुनावणीसाठी दोन्ही गटांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे.

अजित पवारांची सर्वात आधी निवडणूक आयोगात धाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली. अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला होता. पण त्यानंतर शरद पवार गटाकडूनही निवडणूक आयोगात धाव घेण्यात आली होती. दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रे जमा करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत आता संपली आहे. त्यानंतर आता दोन्ही गटांना सुनावणीसाठी नोटीस देण्यात आली आहे.

शरद पवार गटाने अजित पवार गटाचे दावे फेटाळले

या घडामोडींनंतर आता 6 ऑक्टोबरला प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल की आणखी पुढे होईल, याबाबत माहिती समोर येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर अजित पवार गटाने दावा केलाय. तर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळले आहेत. अजित पवार गटाने केलेले दावे चुकीचे असल्याचं शरद पवार गटाने म्हटलंय. तसेच अजित पवार गटाच्या 31 आमदार आणि 9 मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केलीय.