राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सायकलवारी!

| Updated on: Dec 08, 2020 | 10:49 AM

प्रत्येक वर्षी 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सायकलवारी!
Follow us on

नागपूर: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त (National Pollution Control Day 2020) नागपूर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सायकलवरुन महापालिकेत पोहोचले. वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना हा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर सायकल चालवणं आरोग्यसाठीही उत्तम असल्यानं त्यांनी हा पर्याय निवडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलज शर्मा, संजय निपाने यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हे सर्व अधिकारी सकाळी 9.30 वा. आकाशवाणी चौकात एकत्र आले आणि त्यांनी सायकलवर महापालिका गाठली. (Employees of Nagpur Municipal Corporation come to the office on bicycles )

प्रत्येक वर्षी 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. भोपाळच्या युनियक कार्बाइड प्लँटमधून मिथेल आयसोसायनेट गॅसची गळती होऊन ही दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या आठवणीत भारतात हा दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचा उद्देश

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा करण्यामागे वायू प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासोबतच औद्योगिक दुर्घटना टाळण्यासाठी, लोकांना प्रदूषणाच्या स्तरावर काम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांबाबत माहिती देण्याच्या हेतूने हा दिवस साजरा करण्यात येतो.

काय आहे भोपाळ वायू दुर्घटना?

भोपाळमध्ये 1984 साली मोठी दुर्घटना घडली होती. 2 आणि 3 डिसेंबरला यूनियन कार्बाइड प्लॅन्टमध्ये मिथेल आयसोसायनेट गॅसची गळती झाली होती. एका अहवालानुसार या गॅस गळतीमुळे जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मध्यप्रदेश सरकारकडून मृतांच्या आकड्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. त्या गॅस गळतीचे परिणाम हे तेव्हापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर आजही ते पाहायला मिळतात. दिव्यांग मुलांचा जन्म, जन्मानंतर एखादा आजार अशा अनेक समस्या तिथे पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या: 

दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रदूषण वाढ, ‘या’ शहराला आहे सर्वाधिक धोका

Employees of Nagpur Municipal Corporation come to the office on bicycles