दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला

आता दिल्लीतील प्रदूषणामुळे त्यांना अस्थमा किंवा इतर त्रास जाणवू शकतो, असे डॉक्टराचे म्हणणे आहे. | Sonia Gandhi

दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 12:39 PM

नवी दिल्ली: दिल्लीत वायू प्रदूषणाने गंभीर पातळी गाठल्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना डॉक्टरांनी काही दिवसांसाठी शहराबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सोनिया गांधी लवकरच हवापालटासाठी गोवा किंवा चेन्नई येथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Poor air quality forces Sonia Gandhi to shift out of Delhi on doctors’ advice)

सोनिया गांधी यांच्या छातीत संसर्ग (chronic chest infection) झाला आहे. परिणामी दिल्लीतील वायू प्रदूषण त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सोनिया गांधी शुक्रवारी दुपारी दिल्ली सोडतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी असण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया गांधी यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांना छातीमधील संसर्गाची समस्या जाणवत आहे. यासाठी सोनिया गांधी सध्या औषधांचा हेवी डोस घेत आहेत. मध्यंतरी त्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या. त्यावेळी राहुल गांधीही त्यांच्यासोबत होते. मात्र, तेव्हापासून सोनिया गांधी यांची प्रकृती नाजूकच आहे.

आता दिल्लीतील प्रदूषणामुळे त्यांना अस्थमा किंवा इतर त्रास जाणवू शकतो, असे डॉक्टराचे म्हणणे आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी काही दिवस दिल्लीपासून दूर राहावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे सध्या पक्षात अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते पक्षनेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत आता सोनिया गांधी यांना दिल्ली सोडून जावे लागणार आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे ‘आत्मपरीक्षण’ लांबणवीर पडण्याची शक्यता आहे.

बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळला

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात तणाव निर्माण झाला आहे. बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याला काही नेत्यांना पाठिंबा दिला होता. तर गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांनी कपिल सिब्बल यांच्यावर हल्ला चढवला होता. कपिल सिब्बल यांना काँग्रेसची कार्यपद्धती पटत नसेल तर त्यांनी पक्षातून बाहेर पडावे, अशी टीका काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत

बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाची नांदी; सोनिया गांधींच्या मर्जीतील नेत्यांची महत्त्वाची बैठक

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग; पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष द्या, बडे नेते सोनिया गांधींकडे जाणार?

(Poor air quality forces Sonia Gandhi to shift out of Delhi on doctors’ advice)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.