लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील, अशी भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. | Kapil Sibal,

लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

नवी दिल्ली: अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. (Congress leadership thinks it should be business as usual Kapil Sibal on bihar election results)

काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’वरून बराच गदारोळ माजला होता. यानंतत कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी म्हटले आहे की, फक्त बिहारच नव्हे तर देशात ज्याठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवरही विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी आमच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालेले आहे. लोकसभा निवडणुकीतही गुजरातमध्ये हेच घडले होत. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना अवघी दोन टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे, असे सिब्बल यांनी म्हटले.

बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली.

मुळात आपली घसरण होत आहे, ही बाब काँग्रेसने सर्वप्रथम स्वीकारायला पाहिजे. आपले कुठे चुकतेय, हे काँग्रेसला पक्के ठाऊक आहे. मात्र, त्याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील, अशी भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.

यावेळी कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकारणीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. काँग्रेस कार्यकारिणीसाठी लोकशाही पद्धतीने मतदान झाले पाहिजे. कारण, शिफारस करुन निवडण्यात आलेले सदस्य कधीच पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 70 जागा लढवल्या होत्या. यापैकी अवघ्या 19 जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. याचा मोठा फटका महागठबंधनला बसला होता.

संबंधित बातम्या:

‘महागठबंधनसाठी काँग्रेस बाधा, बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनीकला गेले’, राजद नेते शिवानंद तिवारींचा घणाघात

बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?

(Congress leadership thinks it should be business as usual Kapil Sibal on bihar election results)

Published On - 8:10 am, Mon, 16 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI