
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती भागातून मोठी माहिती समोर येत आहे. येथे माओवादी आणि पोलिसांत मोठी चकमक झाली आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घाण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती सीमाभागातील बिजापूर जिल्ह्यात ही मोठी चकमक झाली आहे. यात मोओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही माओवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. यात तीन माओवादी ठार झाले आहेत.
या चकमकीनंतर पोलिसांनी माओवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांच्या डीआरजी, एसटीएफ कोब्रा अशा तीन बटालियनने संयुक्तपणे ही कारवाई केल आहे. महाराष्ट्राचा सीमावर्ती भागात असलेल्या इंद्रावती जंगल परिसरात ही चकमक झाली. इंद्रावती नॅशनल पार्क भागात अगोदरही मोठ्या संख्येत पोलिसांनी माओवाद्यांना ठार केले होते. अजूनही त्या जंगल भागात कॉम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे. त्यामुळे आगामी काळातही येथे आणखी काही माओवाद्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माओवादी आणि पोलिसांतील संघर्ष वाढला आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात माओवाघांनी 11 एप्रिल रोजी लावलेले तीन भुसुरंग स्फोटांचा पोलिसांनी शोध लावला होता. तीन दिवसांअगोदर माओवादी संघटनेने पत्र काढून पहाडीवर मोठ्या प्रमाणात ईडी स्फोटक लावल्याची सूचना गावकऱ्यांना दिली होती. चाच स्फोटांचा शोध अखेर कोब्रा बटालियन व छत्तीसगड पोलिसांनी लावला होता. ही सर्व स्फोटकं नंतर पोलिसांनी निकामी कोली होती. यातील दोन भूसुरंग निकामी करताना पोलिसांनी तब्बल चार तास कसरत करावी लागली होती.