आठ वर्षानंतरही फडणवीसांची पीडित कुटुंबाला साथ; कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

आठ वर्षानंतरही फडणवीसांची पीडित कुटुंबाला साथ; कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
| Updated on: Dec 08, 2024 | 4:43 PM

13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला फाशीची शिक्ष सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. दरम्याान महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली.

विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान शनिवारी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची आकडेवारी सादर करत काही सवाल उपस्थित केले होते. काँग्रेसला 80 लाख मतं पडली तरी त्यांच्या सोळाच जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मत पडली त्यांच्या पेक्षा एक लाख कमी मात्र त्यांच्या 57 जागा आल्या असं शरद पवार यांनी म्हटलं होतं, यावर देखील यावेळी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे, कार्यकर्त्यांचे आणि खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचं ऐकू नये. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पराभव स्विकारला पाहिजे. पवार साहेबांनी जनतेचं मत स्विकारलं पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल, अशा प्रकारची वक्तव्य किमान शरद पवार यांनी तरी करू नये. 50 वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असेलेले ते नेते आहेत. आशा परिस्थितीमध्ये संयमानं वागायचं असतं आणि पराभव स्विकारायचा असतो. ते कदाचित त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या दबावातून असं म्हणत असतील, पण त्यांना मनातून माहिती आहे, पराभव नेमका काशामुळे झाला? असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.