
आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेत्यांनीही पक्षांतर करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांनी महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले. एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले. याच कार्यक्रमावेळी शिंदेंना उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का दिला आहे. एका महिला नेत्याने आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
डोंबिवलीतील शिनसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित हा पक्ष प्रवेश पार पडला. डोंबिवली पश्चिमेत माझी नगरसेवक विकास मात्रे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगला सुळे या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याआधी भाजपच्या माझी नगरसेविका होत्या. आता त्यांनी शिवसेनेच्या साथीने जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज डोंबिवली MIDC अंतर्गत सावळाराम क्रीडा संकुलाच्या लोकार्पण आणि विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मी जिथे जिथे सभा करतो कार्यक्रम करतो तिथे तिथे लाडक्या बहिणींची संध्या पहायला मिळते. लाडकी बहीण योजना महायुती विसरु शकणार नाही आणि विरोधक ही विसरु शकणार नाहीत. मी नेहमी सही करतो कारण समोरच्याला समाधान वाटावे. महायुती म्हणून मी आणि देवेंद्रजींनी खुप विकास कामे केली आहेत. आपत्ती तिथे एकनाथ शिंदे. रवींद्र चव्हाण बरोबर बोलले MMRDA चा निधी महायुतीमुळे या शहरांना मिळू लागला आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. याचा अभिमान आहे. दिलेला शब्द मी पाळणारा आहे असं त्यांनी म्हटले आहे.