अभिजीत दिपके, आदित्य ठाकरे यांचे फोटो फडणवीसांनी व्यासपीठावर लावले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळेच.., राऊतांचा खोचक टोला
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात जेन झेड सोबत संवाद साधणार आहेत, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात जेन झेड सोबत संवाद साधणार आहेत, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत, ज्यामध्ये अभिजीत दिपके असतील, किंवा त्यांचे सहकारी असतील, या सर्वांचा फोटो आपल्या कार्यालयात लावायला पाहिजे. कारण या लोकांमुळेच त्यांना काळालं की जन झी चे काही प्रश्न आहेत. ते कोणत्या संकटातून जात आहेत, त्यांचे पेपर फुटले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नागपूरमध्ये जो कार्यक्रम करत आहेत, त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जे काही तरुण कार्यकर्ते आहेत, जसं की अभिजीत दिपके, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावले पाहिजेत. त्याचं कारण म्हणजे यांच्यामुळेच तुम्हाला आता हे सर्व सूचलं आहे, आणि तुम्हाला ते करावं वाटत आहे. काल जेन झीचा एक मेळावा पुण्यात झाला, तेव्हा याच मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की हा पेड इव्हेंट आहे. मग आज तुमचा काय आहे?’ अशी टीका यावेळी राऊत यांनी केली आहे.
हा पेड इव्हेंट आहे, असं म्हणून तुम्ही मुलांचा अपमान करत आहात. विद्यार्थ्यांचा सर्वांचाच तुम्ही अपमान करत आहात. जर हा पेड इव्हेंट असेल तर मग लाडकी बहीण योजना काय होती? लाडकी बहीण हा मत विकत घेण्यासाठी केलेला पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये मोदी यांनी दहा-दहा हजार दिले, हा सुद्धा पेड इव्हेंटच होता. स्वत: भारतीय जनता पक्षच एक पेड इव्हेंट आहे. भाजप हा काही पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे. महाराष्ट्रात सध्या एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे, त्यावर आपले मुख्यमंत्री फडणवीस काही बोलले आहेत का? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात आहे. आंबेगावच्या एका शाळेमध्ये कच्चं धान्य, कच्चा वाटाणा आणि इतर सर्व हे कुकरच्या तेरा तेरा शिट्ट्या घेऊन सुद्धा शिजत नाही. हे लोकांसमोर आणणाऱ्याल शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं. वहिणीसाहेबांना सांगा हा वाटाणा घरी शिजवा म्हणून, ज्या शिक्षिकेनं याविरोधात आवाज उठवला तिलाच निलंबित करण्यात आलं. हे धान्य पुरवणारे पुरवठादार कुठले आहेत, ते सर्व नागपूरचे आहेत, असा हल्लाबोलही यावेळी राऊत यांनी केला आहे.