AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण मुंबईत मोठं वादळच आलेलं..; ब्राह्मण मराठी अभिनेत्रीचं मुस्लीमशी लग्न, केला प्रचंड विरोधाचा सामना

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची वहिनी आणि अभिनेत्री तन्वी आझमी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा केला होता. मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यामुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

संपूर्ण मुंबईत मोठं वादळच आलेलं..; ब्राह्मण मराठी अभिनेत्रीचं मुस्लीमशी लग्न, केला प्रचंड विरोधाचा सामना
अभिनेत्री तन्वी आझमीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2026 | 11:20 AM
Share

बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. काही कलाकारांचे निर्णय त्या काळात समाजासाठी धक्कादायक ठरले होते. असाच एक निर्णय ज्येष्ठ अभिनेत्री तन्वी आझमी यांनी घेतला होता. ब्राह्मण महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्मलेल्या तन्वी यांनी मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी संपूर्ण मुंबईत मोठी खळबळ उडाली होती. खुद्द तन्वी यांनी एका मुलाखतीत आपल्या लग्नाच्या आठवणी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे, याच घटनेपासून आपल्या आयुष्यात बंडखोरीची सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याचा घेतला निर्णय

तन्वी आझमी यांनी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्याशी लग्न केलं आहे. बाबा आझमी हे प्रसिद्ध गीतकार कैफी आझमी आणि अभिनेत्री शौकत आझमी यांचे चिरंजीव आहेत. तसंच अभिनेत्री शबाना आझमी यांचे भाऊ आहेत. तन्वी यांनी 2024 मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल अनेक वर्षांपूर्वीची आठवण सांगितली होती. या मुलाखतीत त्यांना लहानपणीपासूनच बंडखोर स्वभाव होता का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, त्या लहानपणी अतिशय आज्ञाधारक होत्या. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यानंतर त्यांच्यातील बंडखोर स्वभावाला वाट मिळाली. ती घटना म्हणजे बाबा आझमी यांच्याशी केलेलं लग्न.

पहा फोटो-

‘संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती…’

तन्वी यांनी सांगितलं की, एका ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यामुळे संपूर्ण मुंबईत जणू काही मोठं वादळच निर्माण झालं होतं. अनेकांसाठी ही घटना जगाचा अंत झाल्यासारखी होती. मात्र, त्यांनी स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याचा मार्ग निवडला. या घटनेमुळेच आपल्यातील बंडखोरीची सुरुवात झाली आणि त्यानंतर ती कधीच संपली नाही, असं तन्वी यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या आठवणीमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

तन्वी आझमी या एका प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग आहेत. त्या कैफी आझमी आणि शौकत आझमी यांच्या सून, तर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. मात्र, या प्रसिद्ध कुटुंबाचा भाग असल्यामुळे आपल्यावर कधीही दबाव आला नाही, असं त्यांनी सांगितलं. कुटुंबातील प्रत्येकाची स्वतःची वेगळी वाट आणि क्षमता असते. त्यामुळे आपण कधीही स्वतःची तुलना कुटुंबातील इतर सदस्यांशी केली नाही. आपल्याला आव्हानात्मक आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तन्वी यांनी 1985 पासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील रणवीर सिंहच्या आईची भूमिका विशेष गाजली होती. त्याशिवाय ‘दिल, दोस्ती, डिलेमा’ आणि ‘मामला लीगल है’ यांसारख्या प्रोजेक्टमध्येही त्या दिसल्या आहेत.

Follow Us
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट