AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 लाखांच्या बनावट नोटा 10 लाखांच्या बदल्यात, नाशिकमध्ये मोठा पर्दाफाश, बंगल्यात थेट बनावट नोटाच..

नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्याने मोठी खळबळ उडाली. चक्क एका बंगल्यात बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू होते. पोलिसांना मोठा मुद्देमाल या कारवाईदरम्यान मिळाला.

30 लाखांच्या बनावट नोटा 10 लाखांच्या बदल्यात, नाशिकमध्ये मोठा पर्दाफाश, बंगल्यात थेट बनावट नोटाच..
Nashik
| Updated on: Aug 13, 2026 | 2:38 PM
Share

नाशिक येथे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एक मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस केले. यादरम्यानच्या कारवाईत पोलिसांनी लाखोंच्या बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटा तयार करण्याचा मोठा कारखाना तिथे सुरू होता. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लृप्तीचा वापर करून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या नोटा खऱ्या चलनी विशिष्ट केमिकलमध्ये बुडवल्या जात होत्या. हेच नाही तर आरोपींनी 10 लाख रूपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रूपयांच्या बनावट नोटा देण्याचे अमिष दाखवण्यात आले. हा सर्व व्यवहार सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी अटक केली.

या नोटांची शाई दुसऱ्या कागदावर वटवून दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करण्यात आल्या. ज्यावेळी हा व्यवहार सुरू होता, त्यावेळी कोणीही विचार करणार नाही, असा पोलिसांनी थेट छापा टाकला. या प्रकरणात अमरेश्वर आईथा, मच्छिंद्र घनदाट, हिरामण दाते, गोकुळ दाते, दासरी सत्यइ ही घटना करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव येथील एका खासगी बंगल्यात हा बेकायदेशीर कारखाना सुरू होता. छापेमारीवेळी पोलिसांनी नोटा झापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटिंगचे साहित्य, छापलेल्या लाखोंच्या नोटा, केमिकल आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. हे बनावट नोटा झापणारे रॅकेट फक्त राज्यातच नाही तर देशभरात सुरू होते. हा या रॅकेटला धक्का म्हणावा लागेल.

पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईने धाबे दणाणली आहेत. नाशिकच्या तळेगाव परिसरातील बंगल्यात इतका मोठा बनावट नोटा छपाईचा कारखाना सुरू होता. मात्र, याबाबत कोणालाही माहिती नव्हती. पोलिसांनी मोठी रोख रक्कम जप्त केली. या कारवाईने धाबे दणाणली आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात नकली नोटांचा व्यवहार होत असतानाच ही कारवाई करण्यात आली. या रॅकेटचे कनेक्शन देशभरात पसरल्याचेही स्पष्ट झाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?