वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास, प्रसिद्ध उद्योजकाने थेट मुंबई पुणे महामार्गावर मागवले हेलिकॉप्टर, फोटो शेअर करत…

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. 32 तास लोक वाहतूक कोंडीत अडकले. असूनही वाहतूक सुरळीत झाली नसून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत प्रसिद्ध उद्योगपतीही अडकले होते. त्यांनी थेट हेलिकॉप्टर बोलावले.

वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास, प्रसिद्ध उद्योजकाने थेट मुंबई पुणे महामार्गावर मागवले हेलिकॉप्टर, फोटो शेअर करत...
Pune Mumbai Expressway
| Updated on: Feb 05, 2026 | 11:06 AM

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल 32 तास वाहने जागेवर होती. यादरम्यान गाड्यांमध्ये लहान मुले, महिला होत्या. गॅस वाहतूक करणारा टॅंकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. या टॅंकरमध्ये प्रॉपायलीन हा अतिज्वलनशील गॅस होता. यामुळे वाहतूक थांबवण्यात आली. तब्बल 32 तास वाहने रस्त्यावरून हालली नाही. अनेकजण थेट रस्त्यावर झोपले. पिण्यासाठी साधे पाणीही नव्हते. शेवटी या परिस्थितीत पोलिस मदतीला आले आणि त्यांनी वाहतूक कोडींत अडकून बसलेल्या प्रवाशांसाठी बिकिस्टे आणि पाणी वाटले. 20 किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या असूनही वाहतूक सुरळीत झाली नाही. मध्य रात्री टॅंकरमदील प्रॉपायलीन हा अतिज्वलनशील गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये भरण्यात आला आणि पलटी झालेला टॅंकर हटवण्यात आला.

अद्यापही वाहतूक कोंडी आहे, पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोणावळ्याजवळ अजूनही 5 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 20 ते 22 किलोमीटरची दीर्घ वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहनचालक आपल्या वाहनातच झोपले होते. लोणावळ्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आडोशी बोगदाजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर मोठा ताण आलेला आहे.

एक्सप्रेस वेवर वाहनांची मोठी गर्दी असल्यामुळे अनेक जण जुन्या मार्गाचा वापर करत आहे परिणामी लोणावळा नगरीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या रांगा लागल्या. महामार्गावरील ही वाहतूक कोंडी किती जास्त भयंकर होती हे एका प्रसिद्ध उद्योगपतीने दाखवून दिले. यासोबतच सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता आठ तास या वाहतूक कोडींत होते त्यानंतर त्यांनी थेट हेलिकॉप्टरच्या मदतीने पुणे गाठण्याचा निर्णय घेतला.

सुधीर मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुंबई पुणे महामार्गाच्या दयनीय अवस्था दाखवली. सुधीर मेहता 8 तास या वाहतूक कोडींत होते, त्यानंतर त्यांनी थेट हेलिकॉप्टरने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. थेट महामार्गावरून ते हेलिकॉप्टरमध्ये बसले. सोबतच त्यांनी सोशल मीडियावर याची फोटो शेअर केली. त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर महामार्गावर किती जास्त वाहतूक कोंडी आहे हे देखील फोटोच्या माध्यमातून दाखवले.