सरकारच्या आदेशाला फायनान्स कंपन्यांकडून केराची टोपली, थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन..

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्य सरकारने पाहणी करून दुष्काळाची घोषणा केली. केंद्र सरकारचे पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. मात्र, आता धक्कादायक माहिती पुढे आल्याचे बघायला मिळतंय.

सरकारच्या आदेशाला फायनान्स कंपन्यांकडून केराची टोपली, थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन..
Farmers
| Edited By: | Updated on: Oct 13, 2026 | 8:42 AM

राज्यात दुष्काळ सरकारने जाहीर केला. स्थिती गंभीर आहे. त्यातच एल निनोचे संकट आहे. ऑक्टोबर महिन्यातच हीट बघायला मिळतंय. शेती पिकांचे मोठे संकट आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी आज संकटात आहे. यादरम्यान राज्य सरकारने काही मोठे आदेश शेतकऱ्यांसाठी काढली आहत. जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. येणाऱ्या काही महिन्यात स्थिती अधिक गंभीर होईल. राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडे असलेल्या कर्जाची वसुली थांबवण्यासाठी सरकार घोषणा केली आहे, तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. ग्रामीण भागात अजूनही कर्ज वसुलीसाठी पतसंस्था, छोट्या बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यावाल्याकडून शेतकऱ्यांना धाकदपडट सुरूचं आहे. सरकारी आदेशालाही केराची टोपली दाखवली जात आहे.

अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील संतापजनक प्रकार पुढे आला. फायनान्स कंपनीवाले शेतकऱ्यांच्या घरी जात आणि कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बायकांचे फोटो काढत आहेत. शेतकरी ज्यावेळी घरी नाहीत, अशावेळी त्यांच्याकडून थेट शेतकऱ्यांच्या बायकांचे फोटो काढली जात आहेत.

Loading...

इतकेच नाही तर शेतकऱ्यांना धमाकवत आहेत. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यातून धक्कादायक घटना पुढे आली. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील योगेश नागपुरे या संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबाला आधार देण्याऐवजी कर्जवसुलीसाठी कंपनीचे प्रतिनिधी घरी पोहोचत असल्याचा आरोप होत आहे.

एवढंच नाही, तर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या धरपकड करत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. ज्यावेळी शेतकरी घरी नाहीत, त्यावेळी त्यांच्या बायकांचे फोटोही काढली जात आहेत. सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की, दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांकडून कर्ज वसूली करू नये, तसा अधिकार नाही. पण सरकारच्या आदेशनानंतरही फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसूली थांबवली जात नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us