AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाचा अत्याचार, पिडीत मुलीने उचलले टोकाचे पाऊल

भंडारा येथील एका गावात मुलीच्या मैत्रिणीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर या पीडीत मुलीने विष पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाचा अत्याचार, पिडीत मुलीने उचलले टोकाचे पाऊल
Bhandara case
| Updated on: Apr 20, 2026 | 10:04 AM
Share

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.शाळकरी अल्पवयीन मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर या घटनेने तणावात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी सोमा सालिक मेश्राम (वय ३७) याला पोलिसांनी अटक केली आहे.

भंडारा तालुक्यातील मोहदुरा गावात वर्ग मैत्रीणीच्या वडीलांनीच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलगी ही आरोपीच्या मुलीसोबत एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत. या दोघी एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. गुरुवारी रात्री पीडित मुलगी मैत्रिणीकडे थांबली असताना आरोपी सोमा मेश्राम याने तिला दुचाकीवर फिरायला नेत असल्याचे सांगून स्वत: सोबत नेले. त्यानंतर गुंजेपार परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

शुक्रवारी सकाळी पीडित मुलीने घरी परतल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. ही बाब गावात समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, या घटनेची चर्चा वाढल्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या पीडित मुलीने विषप्राशन केल्याचे समोर आले आहे. तिला तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोक्सो कायद्यांगर्त कारवाई

या प्रकरणी भंडारा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं