तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा? थेट प्रश्नावर उत्तर देत म्हणाले, मी कधीही..
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात जोरदार कारवाया सुरू केल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने सर्वांनी धसका घेतला. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा जिमकडे वळवला आहे. मुख्यमंत्री होण्याबद्दल तुकाराम मुंढे यांना एक प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्यांनी उत्तर दिले.

एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. राज्यभरात जोरदार कारवाया त्यांच्याकडून केल्या जात आहेत. त्यातच तुकाराम मुंढे यांची मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. नुकताच तुकाराम मुंढे पुण्यातील यूथ फेस्टिव्हलला उपस्थित राहिले होते. हजारो युवक आणि युवतींना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तुकाराम मुंढे यांना थेट विचारण्यात आले की, तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? यावरही तुकाराम मुंढे यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री होणे हा फक्त विश लिस्टचा भाग आहे. मुळात म्हणजे मी विश लिस्टमध्ये राहत नाही. मी वास्तवात जगतो. मी एक लोकसेवक आहे. मी माझ्या नोकरीपुरता मर्यादित न राहत भूमिका समजून घेऊन जगण्याचा साधा प्रयत्न करतो.
प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान, प्रतिष्ठा जपणे हीच माझ्या जीवनाची व्याख्या आहे. तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? यावर स्पष्ट मत मांडले. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून त्यांनी कारवाईचा एक धडाका लावला. आपल्या कारवाईवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, सहा महिन्याचा रिपोर्ट आणि जर आताचा रिपोर्ट बघितला तर यावेळी नक्कीच काम कमी झाले.
यंत्रणा, आवश्यक मनुष्यबळ आणि शिफ्टमध्ये काम करत आहोत. पूर्वी रिपोर्ट येण्यासाठी 30 दिवस किंवा सहा महिन्याचा काळ लागत होता. आता 14 दिवसात रिपोर्ट येतो.आम्ही आवश्यक सुधारणा करत आहोत. हेल्थ सप्लिमेंटबद्दलचे दावे चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले.हेल्थ सप्लिमेंटला कोणत्याही प्रकारची मान्यता नाही.
जिम किंवा प्रोटीन विक्रेते हे विकू शकत नाहीत, जर त्यांच्याकडून तसे केले जात असेल तर कारवाई केली जाईल. मुळात म्हणजे जिम चालकांना हे विकण्याचा अधिकारच नाही. जर हे कोणी करत असेल तर कारवाई केली जाईल. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची चर्चा फक्त राज्यातच नाही तर देशभराच होत आहे.