ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गाला गती, आर्थिक पाठबळ मिळाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएच्या महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकताच हा करार केला आहे.त्यामुळेऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गाला गती आणि आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गाला गती, आर्थिक पाठबळ मिळाले
subway file photo
| Updated on: Feb 19, 2025 | 4:47 PM

मुंबईच्या वाहतूकी संदर्भात एमएमआरडीएन मोठे पाऊल उचलले आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गाच्या बांधकामाला मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गासाठी आर्थिक नियोजन केले आहे.मुंबईतील युनियन बँक ऑफ इंडियाने या मार्गाला ७३२६ कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे या मार्गाची उभारणी वेगाने होणार आहे. काय आहे का प्रकल्प पाहूयात…

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे. याप्रसंगी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आणि सहायक महानगर आयुक्त अश्विन मुद्गल आदी मान्यवर उपस्थित होते. एमएमआरडीएच्या निर्णयामुळे मुंबई उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक पाठबळामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन मुंबईकरांसाठी वेगाने प्रवास करण्याचा नवा मार्ग मिळाल्याने वाहतूकीत क्रांती घडणार आहे.

असा आहे ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा –

🔹 प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

✅ ९.२ किमी लांबीचा भूमिगत भुयारी कोस्टल रोड, हा ऑरेंज गेट (ईस्टर्न फ्रीवे) ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडला सलग जोडला जाणार आहे.

✅ ६.५२ किमी दुहेरी-बोगदा प्रणाली विशेष आपत्कालीन लेनसह तयार केली जाणार असून त्यामुळे आणखी सुरक्षा वाढेल.

✅ पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आणि  दक्षिण मुंबईसाठी रिंग रूट तयार होईल

कसा आहे प्रकल्प

या प्रकल्पात ९.२ किलोमीटरचा दुहेरी मार्ग असणार आहे. ज्यात ६.५२ किलोमीटरचे जुळे बोगदे असतील. प्रत्येक बोगदा हा ११ मीटर रुंद असणार आहे.यात दोन लेन वाहतुकीसाठी असतील आणि तिसरी लेन आपत्कालीन वापरासाठी सुरक्षित राखलेली असेल. मानखुर्दला चेंबूर जंक्शन आणि ऑरेंज गेटशी जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेमुळे दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत सुधारणा झाली असली तरी ऑरेंज गेटवरील वाढत्या वाहतुकी कोडींमुळे हा ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह हा दुहेरी बोगदा मार्ग आवश्यक बनला असून त्याला आर्थिक सहकार्य मिळाले आहे.