AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंडणगड एसटी आगारात पाच नव्या बसेसची सुरुवात, लवकरच मिनी बसेसही धावणार

या नव्या बसेसच्या समावेशामुळे स्थानिक प्रवाशांसाठी अधिक सक्षम, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे. आगामी काळात मिनी बसेस देखील उपलब्ध

मंडणगड एसटी आगारात पाच नव्या बसेसची सुरुवात, लवकरच मिनी बसेसही धावणार
Five new buses started operating at Mandangad ST depot, mini buses will also run soon
| Updated on: Jun 21, 2025 | 5:06 PM
Share

मंडणगड एसटी आगारात ५ नव्या एसटी बसेसचा ताफा सेवेत  आला आहे.  राज्य मंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने वाहतूक सेवा बळकट झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५ एसटी बसेसचा ताफा आज मंडणगड एसटी आगारात सेवेत दाखल झाला. या नव्या बसेसचे लोकार्पण मंडणगड आगारात मोठ्या उत्साहात पार पडले.

या उपक्रमामुळे मंडणगड आणि परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे. परिवहन विभागामार्फत पुढील टप्प्यात कोकणासाठी आवश्यक असलेल्या मिनी बसेसचा ताफा लवकरच जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे खेडोपाडी आणि दुर्गम भागातील प्रवास अधिक सोयीचा आणि जलद होईल, अशी माहिती यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

कोकणातील शेवटच्या गावापर्यंत वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी नव्या बसेसचा ताफा ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात मिनी बसेसचाही ताफा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन देखील राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिले आहे.

या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख  प्रतापदादा घोसाळकर, महिला समन्वयक अस्मिता केंद्रे, उपतालुका प्रमुख सुरेशजी दळवी, हरिश्चंद्र कोदेरे, शिवसेना विभागप्रमुख इरफान बुरोंडकर,संजय शेडगे,  दीपक मालुसरे, आनंद भाटे, शहर प्रमुख गटनेते विनोद जाधव, युवासेना कोकण निरीक्षक चेतन सातोपे, तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी मंडणगड तालुका कार्यकारिणी, सरपंच, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, माजी आणि सध्याचे पदाधिकारी, महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.