
मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट भाजपामध्ये प्रवेश केला. संतोष धुरी यांच्या भाजपा प्रवेशनंतर मनसेला धक्का बसला. संतोष धुरी यांच्यासोबतच मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या. संतोष धुरी यांनी काही आरोप करत मनसेला सोडचिठ्ठी दिली. गेल्या 22 वर्षांपासून संतोष धुरी हे भाजपाचे काम करत. निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने त्यांनी नाराज होत भाजपाची साथ दिली. नुकताच राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागले. मुंबई महापालिकेच्या लढतीकडे राज्याच्या नजरा होत्या. मात्र, मुंबईची महापालिका दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही गेली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युती केली. पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्र आल्याचे बघायला मिळाले.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मुंबई महापालिकेचा महापाैर आमचाच होणार आणि तोही मराठीच. मात्र, राज ठाकरे यांचा हा दावा खोटा ठरला असून भाजपाचा महापाैर मुंबई महापालिकेमध्ये बसेल, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपा सह शिवसेना शिंदे गटाचे 118 नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका जर कोणत्या पक्षाला बसला असेल तर तो म्हणजे मनसे आहे. दोन आकडी आकडा देखील मनसेला गाठण्यात यश मिळाले नाही.
मनसेच्या दारूण पराभवानंतर संतोष धुरी यांनी मोठे विधान केले. संतोष धुरी यांनी म्हटले की, मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी भाजपच येणार याचे भाकीत केले होते. मनसेची चेष्टा झाली कुटुंब एकत्र आले तरी 6 जागा यापुर्वी 8 जागा मनसे जिंकले होते. जागा वाटपासाठी गोंधळ घातला वापर करून घेतला जातो आहे दुसऱ्यांला जिंकण्यासाठी मनसेचा वापर केला जातो.
युती आघाडीत मनसेची वरळीतील 1 जागा जिंकली नाही जाणीवपूर्वक शिवसेनेच्या वतीने दुसरा उमेदवार दिला. माहीम, दादर येथे काय फरकाने जागा आल्या आहेत हे पहायला हवं. सामनातील टिकेवर बोलताना संतोष धुरी यांनी म्हटले की, बाहेर पडले म्हणून तुम्ही गद्दार म्हणणार. राज ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, किती वेळा दुसऱ्यांना जिंकून आणणार म्हणजे राज ठाकरेंनी याच्या आधी ज्यांना ज्यांना मदत केली त्यांना त्यांचा फायदा झाला. परंतु मनसेला त्याचा फायदा झाला नाही..वापर झाल्याच्या नंतर गोष्टी टिकून राहतात का हे तुम्हीच ओळखावे..आता वापर करून झालेला आहे, असेही त्यांनी म्हटले.