आता काही खरे नाही… तुकाराम मुंढे यांचा मोर्चा दारू विक्रेत्यांकडे, 60 टक्के..

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात जोरदार कारवाई केली जात आहे. भेसळखोरांना सळो की पळो करून तुकाराम मुंढे यांनी सोडले. तुकाराम मुंढे यांनी आता आपल्या मोर्चा दारू विक्रेत्यांकडे वळवला आहे.

आता काही खरे नाही... तुकाराम मुंढे यांचा मोर्चा दारू विक्रेत्यांकडे, 60 टक्के..
Tukaram Mundhe
| Updated on: Oct 05, 2026 | 2:28 PM

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात जोरदार कारवाई केली जात आहे. भेसळखोरांचे धाबे दणाणली आहेत. सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडसारख्या बड्या कंपन्यांवरही तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाई केली जात आहे. कोणाचीही गय तुकाराम मुंढे यांच्याकडून केली जात नाही. तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड कलाकारांनाही नोटीस पाठवली. राज्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.  मध्यंतरी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली होणार असल्याची चर्चा होती. मात्र, तुकाराम मुंढे यांची बदली होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आपली कुठेही बदली होणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. तुकाराम मुंढे यांचे काैतुक केले जात आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याचीही चर्चा होती.

पनीर, दही, दूध अशा अनेक भेसळखोरांवर तुकाराम मुंढे यांनी कारवाई केली. त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा न्युट्रास्युटिकल्स अर्थात प्रोटीन पावडर विक्रेते आणि दारूत भेसळ करणाऱ्यांकडे वळवला आहे. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, न्युट्रास्युटिकल्स, लेबल, घटक आणि त्यासंदर्भात केले जाणारे दावे, विक्री आदी गोष्टींची पडताळणी एफडीएकडून केली जाणार आहे.

Loading...

सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे सर्वात महत्वाचे आहे. यासंदर्भातील कायदा 2006 आणि 2011 मध्ये अस्तित्वात आला. कठोर अंलबजावणी आवश्यक आहे. अलीकडेच दारूची तपासणी केली असता दारूमध्ये 60 टक्के भेसळ आढळून आली. आता यावर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. अन्नातील भेसळ सर्वाधिक घातक असते. गणेशोत्सवातील कारवाईचा विषय धर्माला जोडला गेला.

या काळातच अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्या कार्यालयात भेट दिली. जर आपण आपल्या घरातील फ्रीमध्ये बघितले तर 90 टक्के पदार्थ हे एक्सपायरी डेट उलटून गेलेले असतात. थोडक्यात काय तर तुकाराम मुंढे हे आता आपला मोर्चा दारू विकेत्यांकडे वळणार आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणली आहेत. काही दिवसापूर्वीच दारूमधील भेसळीमुळे काही लोकांचे जीव गेले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us