अजितदादांबद्दल सर्वांच्या मनात आदर, पण…भाजपच्या माजी आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला सुनावलं

"मी अशा फालतू माणसा सोबत बरोबरी करत नाही किंवा त्याला फार महत्त्वही देत नाही. माझ्या घराण्यात तीन पिढ्यांचे राजकारण, समाजकारण आहे. उभे राहिलेले उमेदवार हे माझ्या मुलाप्रमाणे आहेत"

अजितदादांबद्दल सर्वांच्या मनात आदर, पण...भाजपच्या माजी आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला सुनावलं
Rajan Patil
| Updated on: Feb 07, 2026 | 12:41 PM

“आमचे व्हिडीओ निवडणुकीत बाहेर काढायचे होते, आत्ताही व्हिडीओ बाहेर काढले तरी आम्ही अमेरिकेला वगैरे जाणार नाही” असं भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटील यांना प्रत्युत्तर दिलय. “भाजपच देशाला आणि राज्याला न्याय देऊ शकते. तसेच शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना न्याय देऊ शकते” असं राजन जिल्हा परिषद निवडणुकीवर बोलले. “अजितदादांच्या नावाने मत मागणे हा राजकारणाचा भाग झाला. अजित दादांबद्दल सर्वांच्या मनात आदर होता आणि आजही आहे. मात्र त्याचं भांडवल केल्यास लोक त्या अमिषाला बळी पडणार नाहीत. मुळात विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. तालुक्यात त्यांनी कोणतेही काम केले नाही. केवळ वेगवेगळे इशू घेऊन जनतेपुढे गेले आहेत. अनेक भावनिक मुद्दे पुढे करत निवडणुकीला सामोरे गेलेत. मात्र जनता त्यांना साथ देणार नाही” असं राजन पाटील यांनी म्हटलं.

“जर काही खोटे व्हिडिओ असतील तर त्यांनी गुन्हे दाखल करावेत, आणि आमचे व्हिडिओ असतील तर त्यांनी निवडणुकीत व्हायरल करायला पाहिजे होते. आताही व्हिडिओ असले तरी आम्ही काही अमेरिकेला वगैरे जाणार नाही. आम्ही इथेच राहणार. आम्ही काही एवढे मोठे नाही की अमेरिकेला वगैरे जाऊन राहायला” असं ऑडिओ-व्हिडिओ व्हायरल आरोपावर राजन पाटील यांनी सांगितलं.

मी अशा फालतू माणसा सोबत बरोबरी करत नाही

“मुळात माझी लढाई उमेश पाटलांबरोबर नाही. तो फार बारका माणूस आहे. ते उगाच उंच खुंटीला हात लावतात. मात्र माझी लढाई त्यांच्या विरोधात नाही.माझी लढाई तालुक्यातील विचारांशी लढाई आहे. मी अशा फालतू माणसा सोबत बरोबरी करत नाही किंवा त्याला फार महत्त्वही देत नाही. माझ्या घराण्यात तीन पिढ्यांचे राजकारण, समाजकारण आहे. उभे राहिलेले उमेदवार हे माझ्या मुलाप्रमाणे आहेत. आम्ही सत्तेच्या मागे जाणारी माणसं नाहीत, आमचा तीन पिढ्याचा वारसा आहे” असं राजन पाटील यांनी सांगितलं.

त्यामुळे त्यांना अधिक माहिती असेल

“उमेश पाटील हे फार काळ तालुक्यात राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांना अधिक माहिती असेल मला फार माहिती नाही. मात्र परवा दिवशी सकाळी सर्व चित्र स्पष्ट होईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी. आमचे सर्व कमळाच्या चिन्हावरील उमेदवार निवडून येणार” असं राजन पाटील म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us