AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजाऱ्याशी शारीरिक संबंध ठेव, नशीब उजळेल… दैवी शक्ती असल्याचं भासवून रचलं कारस्थान, माजी भाजप कार्यकर्त्याचा प्रताप

एका महिलेने माजी भाजप कार्यकर्त्यावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, कार्यकर्ता सध्या फरार आहे... 'शेजाऱ्याशी शारीरिक संबंध ठेव, नशीब उजळेल...', दैवी शक्ती असल्याचं भासवून महिलेविरोधात रचलं कारस्थान....

शेजाऱ्याशी शारीरिक संबंध ठेव, नशीब उजळेल... दैवी शक्ती असल्याचं भासवून रचलं कारस्थान, माजी भाजप कार्यकर्त्याचा प्रताप
| Updated on: Aug 03, 2026 | 11:24 AM
Share

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चिमूर तालुक्यातील नेरी गावात राहण्याऱ्या एका महिलेने आरोप केले आहेत की, तिच्या शेजारी राहणाऱ्या 60 वर्षांच्या व्यक्तीने फोनवर महिलेचा आवज काढत, स्वतःला सरकारी अधिकारी सांगत दैवी शक्ती असल्याचं भासवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं… एवढंच नाही तर, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास नशीब चमकेल… असं देखील फोनवरून महिलेला सांगण्यात आलं. पीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेत, पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली. पण कथित आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर येत आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, कथित आरोपीने ऍपच्या मदतीने किंवा कोणत्या टेक्नोलॉजीच्या मदतीने महिलेच्या आवाजात पीडितेसोबत संबंध साधला. सर्वात आधी त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला की, शेजाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेव. ज्यामुळे तुझं आणि तुझ्या मुलाचं भविष्य उज्वल होईल… पण हे मोठं कारस्थान आहे… हे महिलेला कळलं होतं… त्यानंतर महिलेने थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा आरोपीने महिलांना लक्ष्य केलं आहे. यापूर्वी देखील 60 वर्षीय दत्तू पिसे याच्यावर नात्यातल्या महिलेने गंभीर आरोप केलेले… पीडितेने पोलिसांनी सांगितल्यानुसार, याआधी देखील दत्तू पिसे याने महिलेच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळालं नाही. दत्तू पिसे याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आरोपी दत्तू पिसे हा यापूर्वी भाजपचे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरता होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, निवडणुकांदरम्यान पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. सध्या तो चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, मे 2026 मध्ये तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर दोन वेगळ्या नंबरवरुन फोन आले… कॉल करणाऱ्या महिलेने स्वतःची ओळख पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयातील अधिकारी ‘विद्या गोखले’ अशी करून दिली. दरम्यान, तिने त्या महिलेच्या नोकरी आणि जन्मतारखेबाबतची माहिती सांगितली. त्यानंतर तिने ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि कुंडली यांसारख्या विषयांवर चर्चा केली. फोन करणाऱ्या महिलेने पीडितेच्या आयुष्यातील काही घटनांबद्दल जी माहिती दिली ती अचूक ठरल्याचं त्या महिलेने सांगितले; यामुळे तिचा विश्वास वाढला.

त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, फोनवर बोलत असताना समोरच्या महिलेने असा दावा केला की, तिच्या घरासमोर राहणाऱ्या एका पुरुषाकडे दैवी शक्ती आहेत आणि पीडितेने त्याच्याशी संपर्क ठेवावा. त्यानंतर कथित महिलेने पीडितेला तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि खाजगी संबंधांबद्दल अत्यंत वैयक्तिक प्रश्न विचारले.

पीडित महिलेने सांगितल्यानुसार, तिचे पती कॅन्सर पीडित होते आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. पतीच्या फोनची रेकॉर्डिंग कायम सुरु असायची. त्यामुळे फोनवर काय बोलणं झालं आणि काय नाही हे सर्व रेकॉर्ड झालेलं… ती रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर पीडितेला संशय आला. ‘विद्या’ म्हणून बोलणारी व्यक्ती ही स्त्री नसून खुद्द दत्तू पिसेच आहे आणि तोच स्त्रीचा आवाज काढत आहे, याची तिला खात्री पटली. सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं