भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आजोबांना ओढले.. पुढे जे घडले ते… व्हिडीओ व्हायरल..

माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. यादरम्यानच धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे सुरूवातीला हाताला धरून एका आजोबाला ओढताना दिसले.

भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आजोबांना ओढले.. पुढे जे घडले ते... व्हिडीओ व्हायरल..
Dhananjay Munde
| Updated on: Mar 29, 2026 | 8:59 AM

माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करूणा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार असल्याचा सतत दावा केला जात आहे. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे डोळ्याच्या समस्येने त्रस्त आहेत. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी धनंजय मुंडे तिथे होते. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्ट शब्दात बोलताना म्हटले की, मी काय अशोक खरात आहे का? धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का हे सांगायला. मंत्रीपद गेले असले तरीही धनंजय मुंडे परळीत चांगलेच सक्रिय आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांसोबतचा संवाद वाढवत आहेत, आणि बारीक गोष्टींवर लक्ष देत आहेत.

नुकताच परळीतील नाथ्रा येथील एका किर्तनाच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. अगोदर पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे आगमन झाले. दोघे बहीण भाऊ एकमेकांच्या शेजारी बसले होते. सर्वजण किर्तनात मग्न होते. मात्र, यादरम्यान असे काही झाले की, ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बसलेले असताना एक आजोबा धनंजय मुंडे यांचा फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढत होते. हे पाहून धनंजय मुंडे यांनी थेट त्या आजोबांना आपल्याजवळ ओढून घेतले. ते आजोबा जवळ येण्यास लाजत होते पण धनंजय मुंडे यांनी त्यांना आपल्याजवळ ओढले.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आजोबांच्या हातातला मोबाईल घेतला आणि स्वत: आजोबांच्या गळ्यात घात टाकून सेल्फी घेतला. यावेळी पंकजा मुंडे यांनीही फोटोसाठी पोज दिली. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, अचानक धनंजय मुंडे आजोबांना ओढताना दिसल्याने नक्की काय सुरू आहे हे उपस्थितांना कळत नव्हते.

Follow Us