AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनपा निवडणुकीत किती सदस्यीय प्रभागरचना? उमेदवारांसह प्रशासनही पडले गोंधळात

नाशिक महानगर पालिकेत यापूर्वी दोन, चार आणि नंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने बदललेली प्रभाग रचना शिंदे सरकारने रद्द केली होती.

मनपा निवडणुकीत किती सदस्यीय प्रभागरचना? उमेदवारांसह प्रशासनही पडले गोंधळात
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 23, 2022 | 3:17 PM
Share

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्तांना नगर विकास मंत्रालयाने प्रभाग रचनेबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत झाल्यानंतर निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक महानगर पालिकेच्या प्रभाग रचेनत 122 नगरसेवक आहेत. त्याची संख्या महाविकास आघाडीने 133 वर नेली होती. खरंतर फडणवीस सरकार आल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती, त्यानुसार निवडणुकाही पार पडल्या होत्या. त्यामध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. निवडणुका जाहीर होण्याची परिस्थिती असतांनाच राज्यात सत्तांतर झाले. आणि पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यात आता नगर रचना विभागाने नाशिकमध्ये पुन्हा एकदा प्रभाग रचना करण्याच्या आणि आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

नाशिक महानगर पालिकेत यापूर्वी दोन, चार आणि नंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने बदललेली प्रभाग रचना शिंदे सरकारने रद्द केली होती.

2014 मध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती, त्याचा फायदा भाजपाला अनेक ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यानुसार आता पुन्हा एकदा तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून चारचा प्रभाग केला जाणार असून त्यानुसार येत्या काळात लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले असून प्रशासनाकडून अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

नगर रचना विभागाने पत्र पाठविल्याने भाजप आणि शिंदे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र दुसरींकडे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

वारंवार प्रभाग रचेनत आणि आरक्षणात बदल करावा लागत असल्याने प्रशासनाची दमछाक होत आहे. येत्या काळात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार