AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्य सैनिक महादू चौधरींची तिरंग्याला अखेरची सलामी, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन

धुळे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक महादू चौधरी यांचं प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात निधन झालं. ( Mahadu Choudhary Republic Day)

स्वातंत्र्य सैनिक महादू चौधरींची तिरंग्याला अखेरची सलामी, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन
महादू चौधरी, स्वातंत्र्य सैनिक
| Updated on: Jan 26, 2021 | 4:46 PM
Share

धुळे: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्राचं मोठ योगदान आहे. 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच धुळे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक महादू मोतीराम चौधरी यांचं निधन झालं. महादू चौधरी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. धुळे एमआयडीसीतील एका ठिकाणी ते ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते. ( Freedom Fighter Mahadu Choudhary died on Republic day)

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावानजीक असलेल्या क्रांती स्मारक येथे इंग्रजांच्या काळात लुटल्या गेलेला खजिन्याचे महादू चौधरी प्रत्यक्ष साक्षीदार होते. महादू चौधरी यांनी देखील त्यामध्ये सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यसैनिक महादू मोतीराम चौधरी यांचा आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात एका ठिकाणी आयोजित ध्वजारोहनच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. प्रजासत्ताक दिनी एका स्वातंत्र्य सैनिकाचा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये एकच शोककळा पसरली आहे.

पालकमंत्र्यांकडून चौधरी कुटंबीयांची भेट

महादू मोतीराम चौधरी हे 95 वर्षांचे होते. स्वातंत्र्य चळवळीत सातारच्या प्रतिसरकारच्या स्वातंत्र्य सैनिकांनी धुळे जिल्ह्यात इंग्रजांचा खजिना लुटला होता. इंग्रजांच्या काळातील रेल्वेतून खजिना लुटण्यात आला त्याचे एकमेव साक्षीदार व प्रत्यक्षदर्शी उरलेले होते. त्यांचं आज प्रजासत्ताक दिनी एका ध्वजारोहणाचा कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

धुळे जिल्ह्यात घडलेल्या त्या घटनेने इंग्रजांना जबरदस्त धक्का बसला होता. खजाना लुटीची घटनेमध्ये स्वतः सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिक महादू चौधरी यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चौधरी यांच्या घरी भेट दिली. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जाऊन महादू चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एक थोर स्वातंत्र्य सैनिक प्रजासत्ताकदिनी काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

“खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे केंद्र सरकारने जाहीर करावं”

शिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार : नवाब मलिक

( Freedom Fighter Mahadu Choudhary died on Republic day)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.