AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price Hike : आजच्या आज किती पैसे मोजावे लागणार? पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा पुन्हा भडका ! तुमच्या शहरात दर किती ?

देशात पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा ताण आला आहे. अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या या दरवाढीमुळे महागाईचा विळखा अधिक घट्ट होत आहे. तेल कंपन्यांच्या तोट्याचे कारण दिले जात असले तरी, यामुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तू महागणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही इंधन दर वधारले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Petrol-Diesel Price Hike : आजच्या आज किती पैसे मोजावे लागणार? पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा पुन्हा भडका ! तुमच्या शहरात दर किती ?
तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती ? Image Credit source: social media
| Updated on: May 19, 2026 | 12:36 PM
Share

देशभरात महागाईचा विळखा वाढत असून वाढत्या दरांनी सर्वसामान्याचं मात्र कंबरडं मोडलं आहे. अवघ्या 4 दिवसांत देशभरांत पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पाच दिवसांपूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी जनतेला दरवाढीचा धक्का दिला आणि आता आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवण्यात आले आहेत. देशभरात पेट्रोलचे दर 86 पैशांनी तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढले. अवघ्या पाच दिवसांपूर्वी दोन्ही इंधनांचे दर प्रत्येकी 3 रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर आज पुन्हा पेट्रोल-इंधन महागल्याचं दिसून आलं आहे.तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होत असल्याने दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत किंमती वाढवण्यात आल्या आहेत. आज पुन्हा दोन्ही इंधन जवळपास 90 पैशांनी महागली आहेत.

देशभरात झालेल्या इंधन दरवाढीचा सर्वसामान्य जनतेल मात्र चांगलाच झटका बसला असून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने महाराष्ट्रातील विविध शहरातीह इंधनाचे दर बदलले आहेत. मुंबईत पेट्रोल 0.91 पैशांनी तर डिझेल 0.94 पैशांनी महागलं आहे. तसेच पुणे, छत्रपती  संभाजीनगर, नागपूर, रत्नागिरी येथील पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वधारल्याचे दिसून आले आहे.

तुमच्या शहरात किती आहे भाव ?

देशभराती इंधन दरवाढीचा परिणाम महाराष्ट्रातील शहरांवरही झाल्याचे दिसून आले. दरवाढीनंतर मुंबईत इंधनाचे नवे दर समोर आले आहेत. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 107.59 रुपये इतका आहे. तर पुण्यात 107.86 रुपये,  छ.संभाजीनगर येथे 109.47 रुपये, नागपूरमध्ये 108.07 रुपये आणि रत्नागिरीमध्ये 1 लिटरचा पेट्रोलचा भाव हा 109.53 रुपये इतका असल्याची माहिती समोर आली आहे.

15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि आता अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा पटका आमच्याच खिशाला बसत आहे, दरवाढ कशी सहन करायची, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

रत्नागिरीतही दरवाढ, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार

आठवडा भरात दुसऱ्यांचा वाढ झाल्याने इंधन वाढीची सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून रत्नागिरीतही चांगलीच दरवाढ झाली आहे. तिथे पेट्रोल 0.86 पैशांनी तर डिझेल 0.83 पैशांनी वाढले.

रत्नागिरीत कालचे दर

1 ) पेट्रोल – 108.63 2 ) डिझेल – 95.12

रत्नागिरीत आजचे दर

1 ) पेट्रोल – 109.53 2 ) डिझेल -96.0 मी6

या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार असून वाढत्या महगाईचा सामना करायचा तरी कास असा यक्षप्रश्न लोकांच्या मनात आहे.

पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, आधीच महागाई वाढल्ये

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय. पेट्रोलचा दर 109.47 तर डिझेलचा दर 95.95 रुपयांवर पोहोचलाय. इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढून महागाईत आणखी भर पडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. “पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले पाहिजेत, महागाई आधीच खूप वाढली आहे. पंतप्रधान पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आवाहन करतात, मात्र ते स्वतः परदेश दौरे करतात,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?