गडचिरोलीचं भयानक वास्तव, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच नसल्यानं गर्भवतीचा मृत्यू, शवविच्छेदनासाठी लागले तब्बल 14 तास

गडचिरोलीतील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गडचिरोलीत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच नसल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

गडचिरोलीचं भयानक वास्तव, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच नसल्यानं गर्भवतीचा मृत्यू, शवविच्छेदनासाठी लागले तब्बल 14 तास
| Updated on: Aug 13, 2026 | 9:59 AM

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. रुग्णवाहिका वेळेत न आल्याने परभणीत सात महिन्यांची गरोदर महिला आणि पोटातील बाळाच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने वैद्यकीय व्यवस्थेचे विदारक चित्र समोर आलं होतं. रुग्णवाहिकेअभावी मर्जीनाबी अमीन शेख यांचा मृत्यू झाला होता. परभणीनंतर आता गडचिरोलीतूनही एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परभणीच्या जिंतूरमध्ये नेवाती मोहल्ला भागात राहणाऱ्या मर्जीनाबी 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने परभणीतील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती खालावल्याने नांदेडला हलवण्यास सांगितले होते. परंतु मर्जीनाबी यांच्या पत्नीने रुग्णवाहिका हेल्पलाइनला 7 वेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर गडचिरोलीतूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

गडचिरोलीत गरोदर महिलेच्या (Pregnant women)  प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यवस्था पुन्हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भामरागड तालुक्यातील “जन्नी पुसू नैताम” नामक महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने या गर्भवती महिलेला अहेरी महिला आणि बाल रुग्णालयात पाठवण्यात आलं. अहेरी येत असतानाच मधातच या महिलेच्या मृत्यू झाला.

शवविच्छेदनासाठी लागले १४ तास

भामरागड हा तालुका मुख्यालय असून मोठा ग्रामीण रुग्णालय असताना वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्यामुळे या महिलेच्या जीव गेला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एक गरोदर महिलेची बळी गेल्याचं समोर आलं आहे. त्यात गरोदर महिलेच्या शवविच्छेदिनासाठी तब्बल 14 तास वाट बघावी लागली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात आणखी एक गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.   या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us