AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kumar Sanu: समोरच बसलेला दाऊद, मी खूप घाबरलेलो..; कुमार सानू यांचा मोठा खुलासा

Kumar Sanu: कुमार सानू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ते दुबईत दाऊद इब्राहिमच्या पार्टीत परफॉर्म करण्यासाठी गेले होते. नंतर जेव्हा वर्तमानपत्रात फोटो छापून आले, तेव्हा त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं.

Kumar Sanu: समोरच बसलेला दाऊद, मी खूप घाबरलेलो..; कुमार सानू यांचा मोठा खुलासा
कुमार सानू, दाऊद इब्राहिमImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 13, 2026 | 10:00 AM
Share

Kumar Sanu: गायक कुमार सानू यांची नव्वदच्या दशकात खूप क्रेझ होती. बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी ते एक होते. त्यांनी देशात आणि परदेशात असंख्य शोज केले आणि आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वांत मोठा किस्सा सांगितला. अंडरवर्ल्डमधील दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांच्या पार्टीत परफॉर्म करण्यासाठी ते दुबईला गेले होते. अर्थात सुरुवातीला त्यांना हे माहीतच नव्हतं की ते दाऊदच्या पार्टीत गाणं गात होते. जेव्हा त्या पार्टीतील फोटो वृत्तपत्रांमध्ये छापले गेले, तेव्हा त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं होतं.

दुबईत दाऊदसमोर केलं परफॉर्म

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू म्हणाले, “संगीत दिग्दर्शक नदीम यांनी त्यांना दुबईला नेलं होतं. तिथे कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या पार्टीत परफॉर्म करायला जायचंय असं मला वाटलं होतं. तो कार्यक्रम कोणासाठी आहे, तिथे कोण उपस्थित राहणार आहेत, हे मला सांगण्यात आलं नव्हतं. पण प्रत्यक्षात त्यादिवशी दाऊदच्या भावाच्या मुलीचा का त्याच्या मुलीचा तरी वाढदिवस होता. मी आणि गायक अनु मलिक तिथे होतो. दाऊद इब्राहिमसुद्धा तिथे होता. मी त्याला माझ्यासमोर बसलेलं पाहिलं. मी स्टेजवर नेहमी परफॉर्म करणारी गाणी गायली होती. त्यावेळी दाऊद त्याच्या कुटुंबासह समोर बसला होता.”

वर्तमानपत्रात फोटो पाहून बसला धक्का

“काही गाण्यांची फर्माइश मला करण्यात आली होती. मी स्टेजवर सहसा जी गाणी गातो, त्या सर्व गाण्यांची त्यांनी मागणी केली. दाऊद त्याच्या कुटुंबासोबत माझ्यासमोरच बसला होता. त्यानंतर मी त्याला पुन्हा कधीच भेटलो नाही किंवा त्याच्याशी बोललो नाही. आम्हाला त्याबद्दल आधी माहिती नव्हती. एक संगीत दिग्दर्शक मला घेऊन जात होता, त्यामुळे माझा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. ते फक्त म्हणाले, चल तुला दुबईमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीत गाण्याची ऑफर आली आहे. नंतर जेव्हा माझा फोटो वर्तमानपत्रात छापून आला, तेव्हा मला वाटलं, मी हे काय केलं? मला तेव्हा खूप भीती वाटली”, अशी कबुली कुमार सानू यांनी दिली.

अबू सालेमच्या शोमध्येही केलं परफॉर्म

याच मुलाखतीत कुमार सानू यांनी अबू सालेमशी संबंधित एका कार्यक्रमातील घटनेबद्दलही खुलासा केला. “एकाने मला फोन करून धमकी दिली होती की, आम्हाला एवढे पैसे द्या. मी म्हणालो, माफ करा, मी पैसे देऊ शकणार नाही. काही काम असेल तर सांगा. तुम्हाला माझ्याकडून गाणं गाऊन घ्यायचं असेल तर सांगा. मी एकदा अबू सालेमच्या शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी दुबईलाही गेलो होतो. यात घाबरण्यासारखं किंवा लपवण्यासारखं काहीच नाही. जेव्हा पोलिसांना याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी मला निघण्यापूर्वीच इशारा दिला होता की, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नकोस”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

पोलिसांनी दिलेला आधीच इशारा

“मला पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि ते म्हणाले की, तुम्ही अबू सालेमच्या शोमध्ये परफॉर्म करणार आहात का? मी म्हणालो, हो मी जाणार आहे. मी काय करू? पोलीस अधिकारी म्हणाले, तुम्ही जाऊ नका. मी म्हणालो, मी जाणार नाही, पण तुम्ही मला सुरक्षा द्या. जर त्याने माझ्यावर गोळी झाडली, तर सांगा मी काय करू? तुम्ही मला सुरक्षा द्या. त्यानंतरही त्यांनी मला अटकेचा इशारा दिला होता. जर तू गेलास तर आम्ही तुम्हाला तिथे अटक करू. मी म्हणालो, हे बघा एकतर तुम्ही मला सुरक्षा द्या किंवा मला काहीही होणार नाही, याची खात्री करा. मी एक गायक आहे. मला गायलाच पाहिजे. ती माझी गरज आहे. मी तिथे गेलो, परफॉर्म केलं आणि परत आलो. कोणी काहीही म्हणालं नाही. कार्यक्रमानंतर मी हॉटेलवर जाऊन माझं सामान घेतलं आणि परत आलो. ज्या गोष्टीसाठी मला धमकी देण्यात आली होती, तेच मी केलं. मी सुखरुप परत आलो”, असा प्रसंग कुमार सानू यांनी सांगितला.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच