Ganesh Chaturthi: यंदा गणेशोत्सव लाडक्या बाप्पाला ‘हे’ नैवेद्य अर्पण करा!
Ganesh Chaturthi: गणेश चर्तुथीला आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत, आता या गणेशोत्सवात बाप्पाला काय नैवेद्य दाखवणार हे जाणून घ्या...

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, भक्त बाप्पाला त्याचे आवडते नैवेद्य अर्पण करू शकतात. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केला जातो.
गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. गणपती विसर्जन 25 सप्टेंबर 2026 रोजी होईल. या काळात तुम्ही लाडक्या बाप्पाला विविध नैवेद्य दाखवू शकतात.
मोदक - मोदकाचा नैवेद्यात प्रसाद म्हणून गणपतीला प्रमुख्याने दाखवले जाते. मोदक अर्पण केल्याने बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर टिकून राहील.
मोतीचूर लाडू -भक्तगण गणेश चतुर्थीला मोतीचूर लाडू अर्पण करू शकतात. असं म्हटलं जाते की, मोतीचूर लाडू केवळ बाप्पालाच नाही, तर त्यांचे वाहन असलेल्या उंदरालाही आवडतात.
श्रीखंड - श्रीखंड हे बाप्पाचे अत्यंत प्रिय नैवेद्य मानले जाते. हा महाराष्ट्र आणि गुजरातमधील एक पारंपरिक गोड पदार्थ असून तो केशर, दही, सुकामेवा आणि साखर वापरून तयार केला जातो.
पुरणपोळी - गणेश चतुर्थी विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तिथे बाप्पाला पुरणपोळी नैवैद्य दाखवला जातो.
नारळाचे लाडू - गणेशाची पूजा करताना, तुम्ही त्याला नारळाचे लाडवाचा नैवेद्य दाखवू शकतात. नारळाचे लाडू बाप्पाचे सर्वात आवडते आहेत.