…तर अंधारात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, नाशिकमधली मंडळे आक्रमक, पालिकेला इशारा

| Updated on: Sep 09, 2021 | 4:27 PM

नाशिक महापालिकेने (Municipal Corporation) मोठ्या प्रमाणात आकारलेले मंडप आणि जाहिरात शुक्ल (Pavilion and advertising fee) कमी करावे अन्यथा अंधारातच बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू, असा इशारा नाशकातील गणेश (Nashik Ganesh) मंडळांनी दिला आहे. त्यामुळे नाशकात सार्वजनिक गणेश मंडळे विरुद्ध महापालिका अशी संघर्षाची ठिणगी पडली आहे.

...तर अंधारात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, नाशिकमधली मंडळे आक्रमक, पालिकेला इशारा
गणपती बाप्पा मोरया
Follow us on

नाशिकः नाशिक महापालिकेने (Municipal Corporation) मोठ्या प्रमाणात आकारलेले मंडप आणि जाहिरात शुक्ल (Pavilion and advertising fee) कमी करावे अन्यथा अंधारातच बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू, असा इशारा नाशकातील गणेश (Nashik Ganesh) मंडळांनी दिला आहे. त्यामुळे नाशकात सार्वजनिक गणेश मंडळे विरुद्ध महापालिका अशी संघर्षाची ठिणगी पडली आहे. (Ganesh Mandals in Nashik are aggressive against Municipal Corporation, warning of agitation, demand for fee waiver)

नाशकातील गणेश मंडळांना अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्यात येत असल्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ७५० रुपयांचे मंडळ परवानगी शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली. सोबतच महापालिकेने अनेक मंडळांना परवानगी नाकारली आहे. हाच कित्ता गिरवत महावितरणनेही परवानगी दिली नाही. कारण महापालिकेची परवानगी असल्याशिवाय महावितरण कोणत्याही कार्यक्रमाला वीज देत नाही. या धोरणाच्या निषेधार्थ अंधारात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करायचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

पोलिसांचीही परवानगी हवी

एकीकडे शुल्कामुळे गणेश मंडळे नाराज आहेत. तर दुसरीकडे पोलिस विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी, असा फर्मान निघाले आहे. त्यामुळे गणेश मंडळे पोलिसांवरही नाराज झाले आहेत. इतक्या परवानग्या घेत फिरायचे कुठे, असा सवाल पदाधिकारी करत आहेत.

कोरोनाचेही सावट

गेल्या दोन वर्षांपासून शहरात कसलेही सार्वजनिक कार्यक्रम दणक्यात झाले नाहीत. यंदा गणेशोत्सव दणक्यात साजरा होईल अशी आशा होती. मात्र, महापालिकेने आकारलेले जादा शुल्क, महावितरणची परवानगीसाठी नकारघंटा आणि त्यात पोलिसांची परवानगी घ्यावी लागत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले, तर त्याचीही टांगती तलवार उत्सवाच्या निर्बंधावर असणार आहे.

व्यापाऱ्यांची सुगी

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण व्यापाऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतात. या काळात मोठी उलाढाल होते. मोठमोठे मॉल, बड्या कंपन्या विविध खरेदीवर ऑफर ठेवतात. नाशकात सध्या छोट्याछोट्या किराणा दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफरचा बार उडवून दिला आहे. त्यात 3000 हजारांची खरेदी केल्यास त्यावर 250 रुपयांचा थर्मास फक्त 100 रुपयांत मिळत आहे. 4500 रुपयांच्या खरेदीवर हॉटपॉट किंवा अप्पे पात्र 209 रुपयांत, 9000 रुपयांची खरेदी केल्यास त्यावर फ्रायपॅन किंवा डोसापॅन 419 रुपयांत मिळत आहे. (Ganesh Mandals in Nashik are aggressive against Municipal Corporation, warning of agitation, demand for fee waiver)

इतर बातम्याः

नाशकात सोने 47200 वर, चांदीच्या गणेश मूर्तीला मागणी

काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी