
10 हा दिवस आलेला, भक्तांना आशिर्वाद देणारा गणपती बाप्पा आता पुन्हा घरी निघाला असून गणरायासाच्या विसर्जनासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार अून त्यासाठी बरीच तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनही विसर्जनासाठी सज्ज झाले असून विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. चार हजार कॅमेरे पोलीस दल आणि दामिनी पथक सज्ज आहे. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू झाली असून उत्तर पूजा झाल्यानंतर अकरा वाजता विसर्जन मिरवणूक निघेल. 105 वर्षाची परंपरा असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणरायाची आरतीच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढली जाते. राज्यभरातील विसर्जन मिरवणुकीसह महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठीचा हाँ ब्लॉग फॉलो करत रहा..
लालबागच्या राजाचं 12 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर विसर्जन झालं आहे. नव्या तराफ्यामुळे गणेश विसर्जन लांबणीवर पडलं. पण गणपती तराफ्यावर चढवण्यात यश आलं आणि अखेर विसर्जन प्रक्रिया पार पडली.
लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री 10 नंतर होईल असं सुधीर साळवी यांनी सांगितलं आहे. मूर्ती तराफ्यावर चढली असली तर आणखी काही काळ भरतीची वाट पाहावी लागणार आहे.
लालबागच्या राजाचंं विसर्जन प्रक्रिया आता सुरु झालं आहे. तराफ्यावर मूर्ती चढल्यानंतर आरती पार पडली. आता ही मूर्ती समुद्राच्या दिशेने रवाना होणार आहे. पुढच्या अर्धा तासात तराफा पुढे सरकेल.
मनोज जरांगे पाटील हे स्वत:च मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात असा आरोप मराठा समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील केला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाचं नुकसान करत आहेत. ही मागणी घटनात्मक नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. जरांगेंची मागणी आरक्षणाची नाही तर राजकीय असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं.
लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अखेर यश आलं आहे. रात्री साडे दहा ते 11 च्या दरम्यान लालबागच्या राजाचं विसर्जन होईल असं सांगण्यात येत आहे.
पंजाबच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सने परदेशी गँगस्टर गोल्डी ब्रारचा सहकारी बलजिंदर सिंग उर्फ रँचला अटक केली आहे. रँचमधून 5 पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पंजाब डीजीपींनी ही माहिती दिली आहे. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास देखील आहे आणि त्याच्याविरुद्ध अनेक एनडीपीएस गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू आहे.
केडीएमसीच्या प्रसुतीगृहात एका दिवसाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तर मृत्यूची माहिती दोन तास लपवल्याचा आरोप देखील केला आहे. नातेवाईकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी रुग्णालयात गोंधळ घातला.
पुण्याच्या मंचरमध्ये दुकानात गॅसचा भडका उडाला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. शेगडी दुरूस्त करताना गॅसचा भडका उडाला. मंचर सुपर मार्केटमधील सागर इलेक्ट्रिकल्स दुकानात ही घटना घडली.
विजयसिंह पंडितांच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंनी शक्तिप्रदर्शन केलं. लक्ष्मण हाकेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उद्या म्हणजेच सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता इंडिया अलायन्सच्या खासदारांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन करतील.
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी जमली आहे. भरतीमुळे समुद्राचे पाणी वाढल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन झालं नव्हतं, मात्र आता रात्री 10-30 वाजता लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे.
भरतीमुळे समुद्राचे पाणी वाढल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही झालेलं नाही. आता लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे. रात्री 10.30 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी म्हटलं की, लालबागचा राजा हा मुंबईचा राजा म्हणून मुंबईकरांचे अतोनात श्रद्धा त्याच्यावर आहे, सकाळपासून लालबागच्या राजाचं विसर्जन हे काही तांत्रिक कारणांमुळे होत नाही यामुळे माझ्यासारख्या गणेश भक्ताला त्याचं अतोनात दुःख होत आहे.
पुण्यात 31 तासांनी बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका संपल्या
तब्बल 31 तासांनी जल्लोष संपला
लालबागचा राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आली
रात्री साडे दहा वाजेनंतर होणार लालबागच्या राजाचं विसर्जन
थोड्याचवेळात होणार लालबागच्या राजाचं विसर्जन
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी
गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन सकाळी आठ वाजल्यापासून रखडले
उच्च भरतीमुळे मूर्ती तरफावर चढवण्यात अडचण
10 दिवस पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पाला निरोप देताना एका चिमुकल्याला अश्रू अनावर झाले.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या चिमुकल्याचं नाव मनिष जोशी असं असून तो बदलापुरातला आहे.
कल्याणवरून माळशेज मार्गे आळेफाटा येथे 20- 25 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाला आहे. स्टिअरिंग रॉड तुटल्याने बस झाडावर आढळल्याने हा अपघात घडला आहे.5ते 6प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.
रामोशी समाज अनेक प्रश्न देवाभाऊ यांनी सोडविले असून देवेंद्र फडणवीस आता मराठा समाजेचे देखील नेते आहेत असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.
पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये राडा झाला. बँकेचे सभासद एकमेकांना भिडल्याचं समोर आलं. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. प्रश्न विचारण्यावरुन वाद झाल्याने एका सभासदाने माईकच डोक्यात मारला. त्यामुळे जास्तच गोंधळ उडाला.
समुद्रात भरती आल्यानं अद्याप लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही. ओहोटीनंतर 3 च्या सुमारास बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात करणार. हायटाईड कमी झाल्यावर मूर्ती पुन्हा तराफ्यावर चढवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी ओहोटीची वाट पाहत असताना अचानक समुद्रात भरती आल्यानं अद्याप राजाचं विसर्जन झालेलं नाही. भरती असल्यानं राजाती मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी येत असल्याच दिसून येत आहे.
सकाळी 8 वाजल्यापासून लालबागच्या राजाचं विसर्जनाची तयारी सुरु आहे मात्र अनेक प्रयत्न करूनही मूर्ती तराफ्यावर चढवणे शक्य होत नसल्यानं बाप्पाचं विसर्जन खोळंबलं आहे. तराफा बाप्पाच्या उंचीपेक्षा उंच झाल्यानं अडचण येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तब्बल 6 तास झाले तरी राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरच आहे.
गेल्या 28 तासापासून अलका चौकातून 214 गणेश मंडळाचे गणपती विसर्जन स्थळी पोहोचले आहेत. अद्याप अलका चौकात विसर्जन मिरवणूक सुरु असून आणखी 2 तास मिरवणुक सुरु राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही मिरवणूक गेल्या 28 तासांपासून सुरूच आहे.
गेल्या साडेपाच तासांपासून लाल बागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर आहे. हायटाईड कमी झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात येणार आहे. अनेक प्रयत्न करुनही मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अडचण येत आहे. समुद्रात भरती असल्यानं अद्याप राजाचं विसर्जन नाही.
खैरानी रोडवर जी काही दुर्घटना घडली त्यामुळे पाच गणेशभक्त जखमी झाले आणि एकच दुर्दैवी मृत्यू झाला. घटना घडली ती अतिशय क्लेशदायक. जवळ जवळ 30 फूट बेस सहित असलेली ही वायर सुखरूपपणे मूर्तीवरून काढताना करंट लागला आणि झटका बसला. त्यामध्ये एकाचा मृत्यू. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यासाठी आम्ही मदत करू असे आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत पावसाने हजेरी लावली आहे. विसर्जन मिरवणुकीत अचानक पाऊस आल्यामुळे अलका चौक रिकामा झाला आहे. मिरवणुक पाहायला आलेल्यांची पाळापळ झाली आहे.
“नवीन तराफा अत्याधुनिक पद्धतीने आणलाय. त्याचा वापर करण्याच्या अगोदर त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे होतं. कारण निसर्ग आपल्यासाठी थांबत नाही. वेळेतच तराफा तिथपर्यंत जायला पाहिजे. निसर्गाच्या भरतीची वेळ काही बदलत नाही. त्यावेळेनुसार ती भरती येत असते,” अशी प्रतिक्रिया खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी होणाऱ्या विलंबावर दिली.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अलका चौकात ही घटना समोर आली. एक तरुण मिरवणुकीत कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
पुण्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत 163 गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान 60 ते 70 मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीचं सूक्ष्म नियोजन केलं होतं आणि 24 तासांत मिरवणुका संपवणार असं सांगितलं होतं.
मानाचे पाच आणि बाकी महत्वाच्या मंडळांनी वेळा पाळल्या पण त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. मिरवणूक संपायला दुपारचे 2 किंवा 3 वाजण्याची शक्यता आहे.
समुद्रात भरती असल्याने अद्याप लालबागचा राजाचं विसर्जन करण्यात आलं नाही. अनेक प्रयत्नांनंतरही अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढणवस्यास अपयश येत आहे. हायटाइड कमी झाल्यानंतर मूर्ती पुन्हा तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न केले जातील.
काल मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. लालबागचा राजाचे विसर्जन अद्याप बाकी आहे. समुद्रातील भरतीमुळे आणि नवीन तराफा यांच्यातील तांत्रिक बाबीमुळे विसर्जन झालेले नाही. थोड्याचवेळात लालबागच्या राजाचे खोल समुद्रात विसर्जन होईल.
चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आजच्या साई मंदिरातील आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दररोज रात्री 10.30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9.15 मिनिटांनी होणार आहे. आरतीनंतर साईमंदिर दर्शनासाठी बंद होईल. आरतीची वेळ ग्रहण काळात असल्याने आजच्या आरती वेळेत बदल केला आहे.
दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी 32 वर्षीय तरुणी मुक्ता श्रीनाथ या तरुणीचा खोल पाण्यात गेल्याने मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे 22 वर्षीय युवक करण चव्हाण गणपती विसर्जनच्या वेळी त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तर तिसऱ्या घटनेत मेळघाट मध्ये धूळघाट रोडवर गडगा नदी पात्रात गणेश विसर्जना वेळी अनिल माकोडे हा युवक वाहून गेला, या तिन्ही घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढत गणेश भक्तांनी आनंद व्यक्त केलाय. तर राजकीय मंडळींनी देखील बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत आनंद घेतलाय.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान मध्यरात्री ढोल आणि झांज वाजवण्याचा आनंद घेतला आहे.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते.
‘काका मला नाही आधी या पुण्याला वाचावा’, ‘जय खड्डे महाराज प्रसन्न’ शनिवार वाडा गणेश मंडळाचा अनोखा विसर्जन देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यावर लक्ष वेधण्यासाठी गणेश मंडळाचा विसर्जन देखावा दिसून आला.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील रावल गढी वरील श्रीमंत राजा गणपतीचे आज पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले यावेळी मंत्री रावल यांनी विसर्जन मिरवणूक मध्ये ठेका धरून गणेश भक्तासोबत मनसोक्त आनंद घेतला.यावेळी दोंडाईचा पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हिडीओ कॉलमुळे प्रचंड चर्चेत असलेल्या करमाळयाच्या डी वाय एस पी अंजना कृष्णा यांनी गणेशविसर्जन मिरवणुकीत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला आहे.
शरद पवार यांच्या समर्थनार्थ पुण्यात अलका चौकात साखळीपीर तालीम संघाकडून बॅनरबाजी… आजोबा-पणजोबाच्या वयाच मंडळ आहे,शरद पवार यांच्या फोटोवर निष्ठावंत असे बॅनर झळवले
नांदेड येथे गणरायाच्या विसर्जनासाठी नदीत उतरलेले तिघेजण गेले वाहून… एकाला वाचवण्यात यश, दोघे जण बेपत्ता… नांदेडच्या गाडेगाव शिवारातील आसना नदीत घडली घटना… एसडीआरफ पथकाकडून बालाजी उबाळे व योगेश उबाळे या दोघांचा शोध सुरू… काल सायंकाळी गणेश विसर्जन करताना घडली दुर्दैवी घटना
चंद्रग्रहनाच्या पाश्र्वभूमीवर आज तुळजाभवानी मातेचा धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच राञी ९.५७ ते १.३० या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे. शिवाय ग्रहनकालावधीत देवीच्या नित्योपचार धार्मिक पुजा विधीत बदल करण्यात आला आहे.तसेच ग्रहण सुटल्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता पंचामृत स्नान, शुद्ध स्नान आरती व धुपारती होईल. तर सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून नित्याची पूजा होईल.
पुण्याच्या चाकण येथील बिरदवडी येथे 36 वर्षीय व्यक्तीचा गणेश विसर्जन करतांना विहिरीत बुडून मृत्यू झालाय. संदेश पोपट निकम असे विहिरीत बुडलेल्या व्यक्तीचे नाव असून विसर्जन करून विहिरीतून बाहेर येत असताना ही घटना घडली आह. पोहता येत असताना ही व्यक्ती शेतातील विहिरीच्या पाण्यात बुडाली आहे. NDRF च्या टीमने रेस्क्यू करून या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला आहे…
होर्डींग्जवर भगव्या झेंड्यावर देवा भाऊ असा उल्लेख… शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे… मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसाचं आमरण उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला… या निर्णयानंतर सरकारमध्ये महायुती आरक्षण संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून श्रेयवाद सुरू झाल्याची चर्चा रंगली होती… आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाचे बॅनर मुंबईमध्ये दिसतायत… जे चर्चेचा विषय ठरत आहेत…
लालबाग राजाच्या मुर्तीवरील दागिने काढण्यास सुरूवात झाली आहे. काहीवेळातच विसर्जन केले जाईल
चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जणांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुदैवी घटना समोर आलीय. वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन जण बिरदवडी येथील विहिरीत एक जण, शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडाल्याची दुदैवी घटना घडली
अगदी काही वेळातच आता लालबाग राजाचे विसर्जन होणार आहे. भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे गिरगावला दिसत आहे.
सध्या लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. लालबागच्या राजासाठी यंदा अत्याधुनिक तराफा वापरण्यात येणार आहे. आता लालबागच्या राजाची आरती केली जाईल. यानंतर खोल समुद्रात लालबाग राजाचे विसर्जन केले जाईल
लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी एक नवा आणि अत्याधुनिक स्वयंचलित तराफा वापरण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तराफ्याच्या तुलनेत हा तराफा दुप्पट मोठा असून तो पूर्णपणे स्वयंचलित आहे. याआधी विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने तराफा समुद्रात ओढून न्यावा लागत होता, पण आता या नव्या तराफ्यामुळे ती गरज भासणार नाही. या तराफ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात ३६० अंशामध्ये (360 डिग्री) कुठेही वळण घेऊ शकतो, ज्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित होईल.
साकीनाका येथील खैरानी रोडवरील एस. जे. स्टुडिओजवळ गणेश विसर्जन मिरवणुकीत एक दुर्दैवी घटना घडली. टाटा पॉवरच्या हाय-टेन्शन वायरचा धक्का लागल्याने पाच भाविक गंभीर जखमी झाले. जखमींपैकी चार जणांना तातडीने साकीनाका येथील पॅरामाउंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर एकाला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने विनू नावाच्या एका भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर चार भाविकांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पॅरामाउंट हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
लालबागचा राजा गिरगाव चौपाटी जवळ पोहोचला आहे. लालबागचा राजाच्या रथावर अनंत अंबानी देखील उपस्थित आहेत. लालबागचा राजाला पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
लालबागचा राजा ऑपेरा हाऊसवरून गिरगाव चौपाटीकडे निघाला आहे. सध्या लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झाला असून त्याच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
ऐतिहासिक व वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणूकीची गणेश भक्तांना भुरळ असते. गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.
हिंदू- मुस्लीम एकतेचा आगळावेगळा दर्शन करमाळा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वेताळ पेठेत जामा मशीद आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी मानाच्या पहिल्या गणपती श्रीदेवीचामाळ येथील कमलाभवानी देवी मंदिरातील राजेरावरंभा तरुण मंडळाच्या गणरायाचे व विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्वच सहभागी गणरायांचे स्वागत मशिदीतून पुष्पवृष्टी करून केले जाते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परराष्ट्र धोरणावरील विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणतात, “जर आपले परराष्ट्र धोरण मजबूत असते तर आपल्या देशाची आयात आणि निर्यात घसरली नसती. ट्रम्प यांनी (भारत-पाकिस्तान) युद्ध संपवल्याची घोषणा केली. हे लोक कोणाच्या नियंत्रणात आहेत हे यावरून दिसून येते.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशविसर्जनाचा ठिकठिकाणी आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यावरील संकट दूर होवो, अशी प्रार्थना केली.
राष्ट्रपती भवनाने X वर पोस्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
गुजरातमध्ये आज एक मोठा अपघात झाला आहे. पंचमहल जिल्ह्यातील पावगड टेकडी मंदिरात कार्गो रोपवेचा केबल वायर तुटल्याने ६ जणांचा मृत्यू झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे गेल्या 45 वर्षांपासून सुर असलेली परंपरा कायम ठेवत शालेय स्तरावरील राज्यातील सर्वात मोठी गणेश विसर्जनाची मिरवणूक बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज निघाली होती. या मिरवणुकीत तब्बल साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधन करणारे 61 जिवंत देखावे सदर करून चिखलीकरांचे मने जिंकली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे.गेले दहा दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर आज दुपारीनंतर त्या गणपती विसर्जनाला ग्रामीण आणि तसेच शहरामधील भागात सुरुवात झालेली पहायला मिळत आहे. पावसाने उसंत दिल्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये उत्साहाचे आणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते.
नंदुरबार शहरातील नवयुवक लक्ष्मी नगर हमालवाडा मंडळाच्या वतीने यंदाही गणरायाला पारंपारिक पद्धतीने निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने मंडळातील युवकांनी परंपरेला अनुसरून उत्साहात गोप नृत्य सादर केले. हमालवाडा मंडळाची ही विशेष परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंडळातील युवक पारंपारिक वेशभूषेत गोप नृत्य करत मिरवणुकीत सहभागी होतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन
केसरीवाड्याच्या बाप्पाचे विसर्जन
पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपती थोड्याच वेळात पांचाळेश्वर घाटावर होणार दाखल
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्त भावुक
पुण्यात गणपती विसर्जन मुरवणुकीत भक्तांची प्रचंड गर्दी
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” बाप्पाला निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले
आनंद चतुर्थीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांच्या विसर्जनाला जल्लोषात सुरुवात
मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ, भाविकांची गर्दी
पुण्यातील दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
ठरलेल्या वेळात दगडूशेठ गणपतीची मिरवणूक झाली सुरू
दगडूशेठ गणपतीचं विसर्जन ठरलेल्या वेळेतच 7 वाजताच होणार
आमदार हेमंत रासने यांची माहिती
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचा विसर्जन सोहळाही पार पडला. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते बाप्पाचं विसर्जन पार पडलं. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.
काळाचौकीचा महगणपती देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भक्त मुंबईच्या रस्त्यांवर दिसत आहे. नेहमी प्रमाणे काळाचौकीचा महगणपती विसर्जन आहे विशेष. छोट्याशा गल्लीतून बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाताना गणेश भक्तांमध्ये असलेली ती काळजी आणि बाप्पावरचं प्रेम दिसून येतं.
मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मुंबईच्या राजाची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ
लालबागच्या राजाचा शाही विसर्जन सोहळा सुरु झाला आहे. भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी दिसत आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साह दिसत आहे. तसेच लालबागचा राजा आता आपल्या मंडपातून बाहेर पडत असून राजाची शाही मिरवणूक निघणार आहे.
सोलापुरात घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झालीय.सोलापुरातील 1150 गणेश मंडळाचे सकाळपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय. तर महापालिकेतर्फे एक लाख घरगुती मूर्तींचे संकलन करण्यात येणार आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गणपतीची आरती केली.
मालेगाव शहरात गणपती विसर्जनानिमित्त तयारी पूर्ण झाली आहे. 265 मंडळांचे विसर्जन दुपारनंतर होत आहे. तर घरगुती विसर्जन सुरू झाले आहे. पारंपरिक कुंडासह गिरणा व मोसम नदीच्या काठावर महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या गणपती मूर्त्यांसाठी क्रेन, निर्माल्य संकलनासाठी तर 13 वाहने गणपती मूर्ती संकलनासाठी सज्ज आहेत.
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती समाधान ( बेलबाग चौकात दाखल झालाय. गणपती बाप्पाच्या रथासमोर समोर सनई चोवघडा वाजवला जातोय. तर पारंपारिक वाद्य वाजवत त्याचबरोबर गुलालाची उधळण करत मानाचा तिसरा गणपती विसर्जन मार्गांवर पुढे पुढे सरकतोय.
मंत्री गिरीश महाजांच्या उपस्थितीच नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणरायाला अखेरचा निरोप देण्यात येत आहे. विसर्जन मिरवणुकीला शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती आहे. नाशिक मनपाच्या पहिल्या मानाच्या श्रीगणेशाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
सांभाळून गणरायाला निरोप द्या. छोट्या मोठ्या घटना दरवर्षी घडत असतात. गणरायाच्या कृपणे धरणं भरली आहे. नदीत उतरू नका. दुर्घटना होता कामा नये. पोहता येत असले तरी धाडस करू नये, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. प्रशासनानं सगळी काळजी घेतली आहे, असे ते म्हणाले.
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या, भावनिक निरोपात भक्तांचे डोळे पाणावले. आनंद चतुर्थी निमित्त घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांचे जल्लोषात विसर्जनाला सुरुवात झाली आहे. एकीकडे मुंबई पोलिस आणि महानगरपालिकेची जय्यत तयारी करत नियंत्रणासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष ही गणरायाला निरोप देण्यात आलेल्या या गणेश मंडळाच्या स्वागतासाठी राजकारण सोडून जयत तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी बेलबाग चौकात दाखल झाला आहे. पारंपरिक वाद्यांच्या निनादात ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक सुरू झाली आहे. बेलबाग चौक हे पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे केंद्रस्थान आहे. येथूनच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होते. तांबडी जोगेश्वरी गणपती मोठ्या उत्साहात विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ होत आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले असून, संपूर्ण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
मालेगाव शहरात गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून 265 सार्वजनिक मंडळांचे विसर्जन दुपारनंतर सुरू होईल. घरगुती गणपतींचे विसर्जन आधीच सुरू झाले आहे. यंदा महापालिकेने गिरणा आणि मोसम नदीच्या काठावर पारंपरिक कुंडांसह अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची सोय आहे, तर निर्माल्य संकलनासाठी 13 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने 113 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, 570 पोलीस कर्मचाऱ्यांसह महापालिका, अग्निशमन दल आणि स्वच्छता कर्मचारी विसर्जनासाठी तैनात आहेत.
आनंद चतुर्थी निमित्त घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांचे जल्लोषात विसर्जनाला सुरुवात… एकीकडे मुबई पोलिस आणि महानगरपालिकेची जय्यत तयारी करत नियंत्रणासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे… तर दुसरीकडे राजकीय पक्ष ही गणरायाला निरोप देण्यात आलेल्या या गणेश मंडळाच्या स्वागतासाठी राजकारण सोडून जयत तयारी केली असल्याचे दिसून येत आहे… गिरगाव चौपाटी परिसरात विसर्जनासाठी गणेशभक्तांचा लाखोंचा जनसागर उसळला असल्याने शिंदेच्या शिवसेना राष्ट्रीय महिला प्रवक्ताकडून देखील मोठी तयारी करण्यात आली आहे…
मंत्री गिरीश महाजांच्या उपस्थित विसर्जन मिरवणुकीला श्रीगणेशा… पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणरायाला दिला जातोय अखेरचा निरोप… विसर्जन मिरवणुकीला शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती… नाशिक मनपाच्या पहिल्या मानाच्या श्रीगणेशाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
लालबागचा राजाच्या मूर्तीची उत्तरपूजा झाली. लालबागच्या राजाची आरती देखील झाली आहे. त्यानंतर लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघाला आहे…
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या उत्तर पूजेला सुरुवात… पूजा आणि आरती नंतर निघणार विसर्जन मिरवणूक… धो – धो पावसात गणेश भक्ताचा उत्साह शिगेला…. विसर्जन मिरवणुकी सहभागी होण्यासाठी शेकडो भक्त चिंतामणीच्या दरबारात दाखल…
441 मंडळांचे विसर्जन दुपारनंतर… पांजरा नदीकिनारी महापालिकेच्या वतीने 11 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था… विसर्जनाच्या ठिकाणी 100 वाहन ५० वाहन निर्माण संकलनासाठी तर पन्नास वाहने गणपती मूर्ती संकलनासाठी… 11 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर 150 लाईट… 350 कर्मचारी नियुक्त..
गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले, गणेश भक्तांनी विसर्जन काळजीपूर्वक करण्याचे प्रशासनाचे आवाहन. धरणातून गिरणा नदीत 7326 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू. मन्याड धरणातूनही गिरणा नदीपात्रामध्ये 417 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू
441 मंडळांचे विसर्जन दुपारनंतर. पांजरा नदीकिनारी महापालिकेच्या वतीने 11 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था. विसर्जनाच्या ठिकाणी 100 वाहन ५० वाहन निर्माण संकलनासाठी तर पन्नास वाहने गणपती मूर्ती संकलनासाठी.
मुंबईत विसर्जन मिरवणूकांना सुरूवात झाली असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दुसरीकडे पावसाला देखील सुरूवात झाली आहे
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन मार्गांवर मार्गस्थ होत आहे. केशव शंखंनाद पथकाकडून बाप्पासमोर शंखनाद करण्यात येतोय
धाराशिव मध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन विहीर परिसरामध्ये नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. शहरामध्ये शंभरहून अधिक मंडळाच्या मिरवणूक निघणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन विहीर आणि अशा तलावाच्या ठिकाणी नगरपालिकेकडून तयारी करण्यात आली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी खास तयारी करण्यात आली आहे. या वर्षी बाप्पाची विसर्जन मिरवणूक यावर्षी गणनायक रथामधून होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकींना सुरुवात , शहरातील पहिला मानाच्या दादा गणपतीची मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात, लेझीम खेळत बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे.
पुण्यातील पहिला मानाचा कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात येत आहे.
गणेश गल्लीचा गणपती, मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे. हजारो भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत.
जालन्यात पहिल्यांदाच सिमेंटने बनवलेल्या कुंडात गणेश विसर्जन, 40 हजार मुर्त्यांचे होणार विसर्जन. महापालिकेअंतर्गत 19 कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात येत असलेला विसर्जन कुंड तात्पुरता खुला करण्यात आला.
नाशिक – लाडक्या बापाला आज निरोप देण्यात येत असून पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नाशिकमध्ये जवळपास 14 तास विसर्जन मिरवणूक चालणार असून सकाळी साडेदहा वाजता वाकडी बारव इथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महापालिकेतर्फे 28 नैसर्गिक आणि 49 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून पोलीस मिरवणुकीवर नजर ठेवणार आहेत.
अनंत चतुर्थीला लाडक्या बाप्पाला निरोप! गिरगाव चौपाटीवर पहाटेपासून घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू. मुंबई पोलिस-पालिकेकडून सुरक्षा, स्वच्छता व वाहतुकीची जय्यत तयारी. लोखंडी प्लेट्स, सीसीटीव्ही, विद्युत रोषणाईसह चौपाटी सज्ज झाली आहे.