AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganpati Visarjan 2025 : निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी… विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईकर सज्ज, किती वाजता सुरु होणार मिरवणुका?

मुंबईत गणपती विसर्जनाचा आज भव्य सोहळा पार पडत आहे. पोलिसांनी प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. लालबागचा राजा, गणेश गल्ली, आणि इतर प्रमुख गणपतींचे विसर्जन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Ganpati Visarjan 2025 : निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी... विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईकर सज्ज, किती वाजता सुरु होणार मिरवणुका?
| Updated on: Sep 06, 2025 | 8:21 AM
Share

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची दहा दिवस भक्तीभावाने पूजा करण्यात आली. यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटींसह इतर विसर्जन स्थळं ही विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत. मुंबईतील हजारो सार्वजनिक मंडळांचे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन आज या ठिकाणी केले जाणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पोलिसांकडून प्रथमच AI  तंत्रज्ञानाचा वापर

यंदा गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांकडून प्रथमच एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यंदा 6500 सार्वजनिक गणेश मंडळे आणि दीड लाख घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार पोलीस कर्मचारी आणि 10 हजार महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. तसेच, वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

किती वाजता कोणते गणपती होणार मार्गस्थ?

मुंबईतील गणपती मंडळापैकी प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेश गल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, खेतवाडीचा महाराजा या मंडळांकडून विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अवघ्या काही वेळातच मुंबईतील गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहेत. मुंबईचा राजा गणेशगल्लीची विसर्जन मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरु होईल. त्यापूर्वी आता बाप्पाची आरती केली जात आहे. दरवर्षी गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी निघाल्यावरच इतर मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात होते.

तर दुसरीकडे लालबागच्या राजाची दर्शन रांग बंद करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता मंडळाच्या मंडपातून लालबागच्या राजाची मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक उद्यापर्यंत सुरु राहते. तसेच परळचा राजा या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत वरुणराजा बरसला

दरम्यान मुंबईत गणपती विसर्जनाची धामधूम सुरु असताना दुसरीकडे या सोहळ्याला वरुणराजानेही हजेरी लावली आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आज जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.