गंगा जमुना रेड लाईट एरियाचा संघर्ष पेटला, ज्वाळा धोटे पोलिसांना भिडल्या

| Updated on: Aug 22, 2021 | 5:07 PM

नागपुरातील गंगा जमुना ही वारांगणांची वस्ती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सील केली. त्यानंतर संघर्ष वाढायला लागला असून, 15 ऑगस्टच्या दिवशी या वस्तीत लावलेले बॅरिकेट्स राष्ट्रवादीच्या ज्वाळा धोटे यांनी तोडले.

गंगा जमुना रेड लाईट एरियाचा संघर्ष पेटला, ज्वाळा धोटे पोलिसांना भिडल्या
Follow us on

नागपूर : जिल्ह्यातील एका रेड लाईट एरियावर चांगलाच वाद पेटलाय. शहराच्या मध्यभागी असलेल्या गंगा जमुना या रेड लाईट एरियाचा संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. एकीकडे रेड लाईट एरिया वाचविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्वाळा धोटे वारांगणांना सोबत घेऊ संघर्ष करत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांच्या मदतीला वस्तीतील नागरिक आणि गंगा जमुना हटाव संघर्ष समिती मदतीला धावून आल्यानं चांगलीच धुमश्चक्री उडालीय.

वारांगणांची वस्ती काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून सील

नागपुरातील गंगा जमुना ही वारांगणांची वस्ती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सील केली. त्यानंतर संघर्ष वाढायला लागला असून, 15 ऑगस्टच्या दिवशी या वस्तीत लावलेले बॅरिकेट्स राष्ट्रवादीच्या ज्वाळा धोटे यांनी तोडले. मात्र पोलिसांनी ते पुन्हा लावून घेतले. आज रक्षाबंधांचा मुहूर्त साधत धोटे या वस्तीत पोहोचल्या आणि त्यांनी वारांगणांकडून राखी बांधून घेत पुन्हा एकदा बॅरिकेट्स तोडायला सुरुवात केली. पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा त्यांनी बॅरिकेट्स काढण्यात आले. मात्र गंगा जमुना हटाव समितीचे कार्यकर्ते समोरून आले आणि त्यांनी विरोध केला. दोन्ही गट सामोरासमोर आले आणि एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली.

तोपर्यंत या ठिकाणी बॅरिकेट्स लावून बंद ठेवू देणार नाही

या वस्तीतील वारांगणांचं पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी बॅरिकेट्स लावून बंद ठेवू देणार नाही, त्यासाठी संघर्ष करणार असल्याचंही ज्वाळा धोटे यांनी सांगितलं. गेली कित्येक वर्षे वारांगणांची ही वस्ती या ठिकाणावरून हटविण्याची संघर्ष समितीद्वारे मागणी केली जात आहे. पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्य असून, ही वस्ती लवकरात लवकर इथून हटवून त्याच दुसरीकडे पुनर्वसन करावं, अशी मागणीही संघर्ष समितीने केलीय.

या वस्तीमुळे या ठिकाणी अनेक अवैध धंदे चालतात

यासंदर्भात कोर्टानेसुद्धा निर्णय दिला असल्याच त्यांचं म्हणणं आहे. या वस्तीमुळे या ठिकाणी अनेक अवैध धंदे चालतात, त्याचा असा त्यांचा आरोप आहे. नागपुरातील या रेड लाईट परिसराचा संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, दोन्ही पक्ष सामोरासमोर असल्याने भविष्यातही या ठिकाणचा व्यवसाय बंद होणार की मग संघर्ष असाच सुरू असेल हे पाहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

नागपूर विभागात दमदार पावसाची प्रतीक्षा, धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांनी कमी, तूट भरुन निघणार?

नागपुरातील तडीपार गुंडाकडे अडीच किलो गांजा, तस्करी प्रकरणात बेड्या

Ganga Jamuna Red Light Area clashes erupted, jwala dhote dispute police