नागपुरातील तडीपार गुंडाकडे अडीच किलो गांजा, तस्करी प्रकरणात बेड्या

गेल्या काही दिवसांपासून रंगारीने गांजाची तस्करी सुरु केली होती. गुन्हे शाखेचे पथक सक्करदऱ्यात गस्त करत असताना त्यांना तो संशयास्पद अवस्थेत मोटारसायकलने जाताना दिसला.

नागपुरातील तडीपार गुंडाकडे अडीच किलो गांजा, तस्करी प्रकरणात बेड्या
तडीपार गुंडाला गांजा तस्करी प्रकरणात अटक
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 8:28 AM

नागपूर : नागपुरातील तडीपार गुंडाला गांजा तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रंगारी हा नागपूरमधील कुख्यात गुन्हेगार आहे. पोलिसांच्या झडतीत त्याच्याकडे दोन किलो 260 ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि धारदार चाकूही आढळला.

काय आहे प्रकरण?

रंगारी हा सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी नागपुरातून त्याला तडीपार करण्यात आले होते. त्याला नागपूर जिल्ह्याबाहेर नेऊन सोडण्यात आले होते. मात्र आरोपी रंगारी नागपुरात परतला आणि गुन्हेगारीतही सक्रिय झाला होता.

संशयास्पद अवस्थेत बाईक प्रवास

गेल्या काही दिवसांपासून त्याने गांजाची तस्करी सुरु केली होती. गुन्हे शाखेचे पथक सक्करदऱ्यात गस्त करत असताना त्यांना आरोपी रंगारी संशयास्पद अवस्थेत मोटारसायकलने जाताना दिसला.

अडीच किलो गांजासह चाकूही जप्त

रंगारीला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो 260 ग्रॅम गांजा, एक मोबाईल, धारदार चाकूही आढळला. तो जप्त करुन पोलिसांनी त्याला गांजा तस्करीच्या आरोपात अटक केली.

नागपुरात कारच्या सीटखालून गांजा तस्करी

दरम्यान, नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पकडलं होतं. एका कारमधून उत्तर प्रदेशमधील आरोपी गांजा तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. कारच्या सीटखाली आणि डिक्कीच्या खालच्या भागात गांजा लपवून ठेवण्यात आला होता. 35 पॅकेटमध्ये 69 किलो 500 ग्राम गांजा सापडला आहे. जवळपास 6 लाख 95 हजार रुपये किमतीच्या गांजाची तस्करी केली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

वाशिममध्ये घरातून गांजा जप्त

वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील घरकुलात अवैध रित्या गांजा साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत एकूण 15 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

पुण्यात गांजा विकायला आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक

घरकुलात लपवला 15 किलो गांजा, वाशिम पोलिसांकडून महिलेला बेड्या

कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.