
येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे येथील मूर्ती कारखान्यांमध्ये कामाला वेग आला आहे. मूर्ती घडविण्यासाठी शेकडो हात रात्रदिवस राबत आहेत. 6 इंच पासून तर 22 फुटापर्यंत मुर्त्या कारखानामध्ये तयार होत आहेत.

यंदा मुर्त्यांच्या किमतीत पंचवीस ते तीस टक्के वाढ झाली आहे. पाच हजारांपासून दीड लाखांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मुर्त्यांना महाराष्ट्र राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते.

गुजरात, मध्य प्रदेशसह राजस्थान राज्यात सर्वात जास्त नंदुरबारमधील गणपतींची मागणी आहे. नंदुरबार जिल्हा हा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा वरती भागात असल्याने या भागातून गणेश मुर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे गणेश मूर्तीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यावर्षी सोशल मीडियावर पाहून मूर्ती बुक केली जात आहे. महिन्याभरापूर्वीपासूनच गणेश मूर्ती बुकिंग करण्यात येत असल्याचे मूर्तिकार नारायण वाघ यांनी सांगितले आहे.

गणेश उत्सव आता काही दिवसांवर आला आहे. यामुळे विविध प्रकारच्या मुर्त्या तयार करण्यास कारागिरांनी वेग घेतला आहे. मागणीनुसार मोठ्या मंडळाच्या मुर्त्या तयार केल्या जात आहेत. यावर्षी मुर्त्यांच्या किंमतीत पंचवीस ते तीस टक्क्यांने वाढ झाली आहे.