AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती, 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू, दोन जखमी

पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे, तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीत गॅस गळती झाल्यानं चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेशुद्ध झाले आहेत.

मोठी बातमी! तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती, 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू, दोन जखमी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2025 | 7:55 PM
Share

पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे, तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीत गॅस गळती झाल्यानं चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेशुद्ध आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मासिटीकल कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे, तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर एफ 13 मध्ये ही कंपनी आहे. आज दुपारी अडीच ते तीन दरम्यान ही घटना घडली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर एफ 13 मध्ये मेडली फार्मासिटीकल कंपनी आहे, या कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. वायू गळतीमुळे सहा कामगार बेशुद्ध झाले होते, त्यातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना तातडीनं येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान ही घटना घडली आहे,  दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, वायु गळतीचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

मेडली फार्मा या कंपनीमध्ये असलेल्या नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये गॅस गळती झाल्याने हा अपघात घडला आहे. या दुर्दैवी घटनेत सहा व्यक्ती बेशुद्ध झाल्या होत्या, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून,  दोघांची परिस्थिती गंभीर आहे, त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये भरती करण्यात आलेले आहे. कल्पेश राऊत,  बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव असं या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचं नाव आहे, तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ असं या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नाव आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

गॅस गळतीचं कारण अस्पष्ट  

दरम्यान ही गॅस गळती नेमकी कशी झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था