Girija Raut : लिंबू, दोरे अन्..गिरीजा राऊत प्रकरणात पहिला पुरावा समोर? पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलं?

गिरीजा राऊत यांची बाजू मांडणारे अॅड. सागर कदम यांच्या दाव्यानुसार फिरोज शेख अघोरी कृत्य करतात. न्यायालयात काय घडलं, याची माहितीही त्यांनी दिली. आम्ही आज कोर्टात आरोपीची पोलीस कोठडी मागितली. ⁠14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Girija Raut : लिंबू, दोरे अन्..गिरीजा राऊत प्रकरणात पहिला पुरावा समोर? पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलं?
girija raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 3:06 PM

Girija Raut : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्याच सूनेने गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक हिंसा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राऊत कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पती गितेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्या असमर्थ आहेत, मला फसवण्यात आलं, असा दावा केला आहे. गितेश राऊत हे विनायक राऊत यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान, गिरीजा राऊत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी पहिली अटक झाली आहे. सोबतच पोलिसांना काही पुरावे मिळाले असल्याचा दावाही गिरीजा राऊत यांच्या वकिलांनी केला आहे.

सात जणांपैकी पहिल्या व्यक्तीला आता अटक

गिरीजा राऊत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. पोलिसांनी एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांचादेखील समावेश आहे. दरम्यान, याच सात जणांपैकी पहिल्या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील सात आरोपींपैकी दोघे हे भोंदूबाबा आहेत. यापैकी एकाला अटक करण्यात आले आहे. फिरोज शेख असे या भोंदूबाबाचे नाव आहे. तर दुसरा भोंदूबाबा काझी याच्या शोधासाठी पोलिसांची दोन विशेष पथके तयारीत आहेत.

भोंदू फिरोज शेख याची कसून चौकशी होणार

भोंदू फिरोज शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कोठडी मिळावी यासाठी त्याला न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आता भोंदू फिरोज शेख याची कसून चौकशी करणार आहेत. या चौकशीनंतर आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

⁠14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली

गिरीजा राऊत यांची बाजू मांडणारे अॅड. सागर कदम यांच्या दाव्यानुसार फिरोज शेख अघोरी कृत्य करतात. न्यायालयात काय घडलं, याची माहितीही त्यांनी दिली. आम्ही आज कोर्टात आरोपीची पोलीस कोठडी मागितली. ⁠14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. ⁠पुजापाठ तिथे करतात असे वकिलांनी कोर्टात सांगितले.

लिंबू, धागे-दोरे आढळून आले

⁠तपास अधिकारी यांनी कोर्टात इतर आरोपींचा शोध सुरू आहे असे सांगितले आहे, अशी माहिती सागर कदम यांनी दिली. तसेच ⁠रिमांड रिपोर्टमध्ये पंचनामा करताना पोलिसांनी आरोपीला अटक करत असताना लिंबू, धागे-दोरे आढळून आले आहेत, असेही सागर कदम यांनी सांगितले आहे. ⁠इतर आरोपींच्या अटकेबाबतही आम्ही मागणी करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, आता या प्रकरणी नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us